Take the chicken, for only 5 rupees 
पश्चिम महाराष्ट्र

चिकन घ्या चिकन.... फक्त ८० रूपयांना किलोभर, रस्त्यावर थाटली दुकाने

दत्ता इंगळे

नगर तालुका ः गेल्या महिनाभरापासून कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. "कोरोना'च्या भीतीने राज्यभरात अनेक ठिकाणी चिकन खाणे बंद झाल्याने हा व्यवसाय जवळपास संपुष्टात आला आहे. जगभरात "कोरोना'च्या भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील कुक्कुटपालन (पोल्ट्री) व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. 


नगर तालुक्‍यातील बहुतेक गावांत शेतीला जोडव्यवसाय म्हणून "पोल्ट्री' व्यवसायाकडे पाहिले जाते. राज्यभर मोठ्या प्रमाणात या व्यवसायाचे जाळे पसरले आहे. या व्यवसायात पिले मोठी करून ती विकली जातात.

गेल्या महिनाभरात कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्याने अनेकांनी चिकन व अंडी खाणे बंद केले आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात "पोल्ट्री' चिकनचे भाव 170 रुपये प्रतिकिलो होते, तर अंडी साडेचारशे रुपये शेकडा होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात "पोल्ट्री' चिकनचे भाव 80 ते शंभर रुपये प्रतिकिलोवर आले आहेत, तर अंड्यांचे भाव साडेचारशेवरून तीनशे ते साडेतीनशे रुपयांवर आले आहेत. 
 
व्यावसायिकांना फटका 
अनेक शेतकरी "पोल्ट्री' व्यवसायाकडे खात्रीशीर उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून पाहतात. राज्यातील अनेक कंपन्या या व्यवसायात असून, शेतकऱ्यांशी त्यांनी करार केले आहेत. "कोरोना'मुळे ग्राहक झपाट्याने कमी झाल्याने पक्ष्यांच्या किमती लक्षणीयरीत्या उतरल्या आहेत. त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. 

"कोरोना'मुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. ग्राहक झपाट्याने कमी होत आहेत. ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. "कोरोना'चा फटका पोल्ट्री कंपन्या, शेतकरी व किरकोळ विक्रेत्यांना बसला आहे. 
- अंकुश गायकवाड, "पोल्ट्री' उत्पादन विक्रेता 
... 

"कोरोना'चा संबंध नाही 
"कोरोना' आणि चिकन, अंडी यांचा कुठलाही संबंध नाही. देशात चिकन, मटण शिजवून घेतले जाते. आपल्या देशात कोठेही मांस कच्चे खाल्ले जात नाही. शिजविलेल्या कोणत्याही पदार्थात हा विषाणू जगू शकत नाही. केवळ भीतीमुळे आपल्याकडे चिकन, अंडी खाणे बंद केले गेले आहे. याबाबत आम्ही जिल्हा पातळीवर जनजागृती करीत आहोत. 
- डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT