Talathi abducted and beaten 
पश्चिम महाराष्ट्र

कॉपी न दिल्याने तलाठ्याला चोपले... कोणती कॉपी ते पहा...

सकाळ वृत्तसेवा

शेवगाव : किरकोळ वादातून बालमटाकळी येथील तलाठ्यास शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.श्रीमंत सुभाष सोनवणे (रा. घोगस पारगाव, ता. शिरुर, बीड) असे आरोपीचे नाव आहे. 

याबाबत बालमटाकळी सजाचे तलाठी बाबासाहेब जगन्नाथ अंधारे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार काल (ता. 25) दुपारी बाराच्या सुमारास आरोपी श्रीमंत सोनवणे तलाठी कार्यालयात आला. आजोबांनी बक्षीसपत्र केलेल्या नोंदीवर कोणी हरकत घेतली, अशी विचारणा करीत तक्रार दाखविण्याची मागणी केली. त्यानुसार तलाठी अंधारे यांनी त्यास तक्रार दाखविली. त्यावर आरोपीने तलाठ्याकडे तक्रारीची कॉपी मागितली. मात्र, त्यासाठी अर्ज करावा लागेल, असे तलाठ्याने सांगितले. त्याचा राग आल्याने सोनवणे याने तलाठी अंधारे यांना शिवीगाळ करीत लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. 

महसूल विभागात खळबळ 
किरकोळ तक्रारीवरून तलाठ्याला शिवीगाळ व बेदम मारहाण केल्यामुळे शेवगाव तालुक्‍यात महसूल विभागात खळबळ उडाली आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd T20I Live : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बघा काय बदल झाला! अर्शदीपला मिळाली का संधी?

Namo Tourism Centre Controversy : राज ठाकरेंचा 'नमो टुरिझम सेंटर' तोडण्याचा इशारा, शिंदे गटानं दिलं चोख प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

Inside Story Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची बंद दाराआड काय घडली चर्चा, राजू शेट्टींनी सांगितली इनसाईड स्टोरी...

MPSC Result 2024: राज्यसेवा परीक्षा निकाल जाहीर! सोलापूरचा विजय लामकणे राज्यात पहिला

SCROLL FOR NEXT