There is controversy in Holi at madhi  
पश्चिम महाराष्ट्र

होळीवरून वाद पेटला... पहा कोणता 

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : मढी येथे होळी पेटविण्याचा मान यंदा गोपाळ समाजातील दुसऱ्या गटाला देण्याची मागणी गोपाळ समाजहित महासंघाने केली आहे. त्यामुळे 9 मार्च रोजी होळी कोणी पेटवायची, यावरून वाद होण्याची चिन्हे आहेत. 

मढी येथील कानिफनाथांच्या मंदिर उभारणीत भटक्‍या समाजातील अनेकांनी योगदान दिले. त्यानुसार प्रत्येक समाजाला मढी यात्रेत विविध मान देण्यात आले. गोपाळ समाजाने मंदिरासाठी दगड वाहण्याचे काम केल्याने या समाजाला होळी पेटविण्याचा मान मिळाला. हुताशनी पौर्णिमेला गोपाळ समाज मंदिराच्या पायथ्याला होळी पेटवितो. मानकऱ्यांना देवस्थान समिती गोवऱ्या देते. यापूर्वीही होळी पेटविण्यावरून गोपाळ समाजातील दोन गटांत वाद झाला होता. न्यायालयाने 25 फेब्रुवारी 1999 रोजी दोन्ही गटांत सुलेनामा केला. होळी पेटविण्याचा मान गोपाळ समाजातील माणिक लोणारे, जगन्नाथ माळी, हरिभाऊ हामरे, हरिदास काळापहाड, पुंडलिक नवघरे, सुंदर गिऱ्हे यांना दिला. त्यानंतर पुढील दोन-तीन वर्षे तणावातच येथील होळी पेटली. 

यंदा 9 मार्च रोजी होळीचा सण आहे. याच दिवशी मढी येथे होळी पेटवली जाणार आहे. मात्र, यंदा आम्हीच होळी पेटविणार, तशी परवानगी देवस्थान व प्रशासनाने द्यावी. सध्याचे मानकरी धनदांडगे व सुशिक्षित असून, त्यांनी जाणीवपूर्वक हा मान स्वत:कडे ठेवला आहे. न्यायालयाच्या आदेशात दरवर्षी मानकरी बदलले जावे, असे ठरले होते, असा दावा गोपाळ समाजहित महासंघाने केला आहे. 

गोपाळ समाजातील पुंडलिक धनगर, शंकर पवार, बाळासाहेब पवार, भाऊसाहेब चौगुले, भरत गव्हाणे, पोपट गव्हाणे यांना यंदा हा मान द्यावा, अशी मागणी संघाने केली आहे. याबाबत तहसीलदार नामदेव पाटील यांनी सर्वांचे जबाब नोंदविले. देवस्थानाचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांचाही जबाब घेतला. या वादामुळे पोलिस व महसूल प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. येत्या एक-दोन दिवसांत तहसीलदार त्यावर निवाडा देतील. मात्र, त्यांचा निर्णय एका गटाने मान्य न केल्यास, होळीला मढी येथे गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने पोलिस व महसूल प्रशासन सतर्क झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर ट्रक अपघातात वाचले, रस्त्यावर थांबले असताना रुग्णवाहिकेनं उडवलं; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Sangli Raisin : ‘भारतीय’ नावाचा मुखवटा, आतून चीनी बेदाणा! तासगाव बाजारातील घोटाळ्याने शेतकरी संतप्त

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

Pune Municipal Election : भाजपने तरुणांना दिली संधी; आमदार, खासदारांच्या नातेवाइकांना लावली कात्री

Ujani Dam: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! डिसेंबरअखेर उजनी धरण १०० टक्केच भरलेले; शेतीसाठी १५ जानेवारीनंतर मिळणार पाणी..

SCROLL FOR NEXT