The Thief Stole 100 Grams Of Gold At Karad 
पश्चिम महाराष्ट्र

रमल्‍या लग्नातील फोटोसेशनला, गेले दहा तोळे सोने

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) : लग्नानंतर फोटो काढण्यास स्टेजवर गेल्यावर शेजारीच असलेल्या साऊंड सिस्टिमवर ठेवलेल्या पर्ससह त्यातील दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोकड असा दोन लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. सुखेंदू छोटालाल दोशी (वय 51, रा. राशीन, ता. कर्जत, जि. नगर) यांनी त्याबाबतची फिर्याद दिल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुखेंदू दोशी यांच्या मुलीचे दीर अक्षय शहा यांचे लग्न 20 जानेवारीला पंकज मल्टिपर्पज हॉलमध्ये होते. दोशी यांची मुलगी प्रांजल हिने तिच्याकडील सोन्याचे दागिने पर्समध्ये घालून दोशी यांच्या पत्नीकडे ठेवण्यासाठी दिले. लग्न झाल्यावर शहा यांच्या पत्नीने सुखेंदू दोशी यांच्याकडे पर्स दिली होती. काही वेळाने दोशी ओळखीच्या पाहुण्यांचा फोटो मोबाईलवर काढण्यासाठी गेले. फोटो काढत असताना दोशी यांनी पर्स तेथेच बाजूला असलेल्या साऊंड सिस्टिमवर ठेवली. 

फोटो काढून काही वेळानंतर ती पर्स तेथून गायब झाल्याचे दोशी यांच्या लक्षात आले. त्यांनी इतरत्र शोध घेतला. मात्र, पर्स व त्यामधील दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोकड असा दोन लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. त्याची फिर्याद दोशी यांनी आज शहर पोलिसांत दिली. त्यावरून चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग मेपर्यंत पूर्ण होणार, पण...; राज्य सरकारने दिली महत्त्वाची माहिती

T20 WC, IND vs WI: 'माझे ११ सैनिक सज्ज आहेत...' विंडीजच्या सॅमीची टीम इंडियाला सामन्यापूर्वी चेतावणी

Nashik Malti IVF Center : बदलापूर स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून 'मालती आयव्हीएफ'ला नोटीस

Latest Marathi News Update : चेंबूर येथील दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

Kolhapur : 'ड्यूटी'वरून एलसीबीचे दोन 'पाटील' भिडले, पोलिस अधीक्षक कार्यालयातच सुपारी देऊन संपविण्याची भाषा

SCROLL FOR NEXT