three died in an accident in paithan 
पश्चिम महाराष्ट्र

दाम्पत्यासह तिघांचा अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

अमरापूर (शेवगाव, नगर) : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ झालेल्या अपघातात ढोरजळगाव (ता. शेवगाव) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

इसारवाडी फाटा (ता. पैठण) येथे आज पहाटे कार व कंटेनरचा अपघात झाला. त्यात कारमधील ढोरजळगाव येथील बाळासाहेब निवृत्ती डाके (वय 45), अंबिका बाळासाहेब डाके (वय 40) या पती-पत्नीसह सुमनबाई रघुनाथ नरवडे (वय 60, रा. वरूर, ता. शेवगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. 

समोरून येणाऱ्या कंटेनरची धडक

ढोरजळगाव येथील डाके त्यांच्या पत्नी अंबिका यांना घेऊन उपचारासाठी स्वतःच्या कारमधून (एमएच 12 सीके 3468) औरंगाबादला जात होते. सोबत त्यांच्या सासू सुमनबाई नरवडे याही सोबत होत्या. पहाटे चारच्या सुमारास पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील इसारवाडी फाट्यावर समोरून येणाऱ्या कंटेनरची (जीजे 06 एजे 6851) त्यांच्या कारला धडक बसली.

उपचारासाठी नेताना तिघांचाही मृत्यू

ही धडक एवढी जबर होती की त्यात कार कंटेनरसोबत सुमारे पाचशे मीटरपर्यंत फरफटत गेली. त्यातील तिघांनाही कारचे दरवाजे कापून बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी नेत असताना तिघांचाही मृत्यू झाल्याचे पैठण एमआयडीसी पोलिसांनी सांगितले. डाके दाम्पत्यावर सायंकाळी ढोरजळगाव येथे, तर नरवडे यांच्यावर वरूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

कुटुंब पोरके झाले

बाळासाहेब डाके यांचे शेवगाव-पांढरी पूल रस्त्यावरील ढोरजळगावात टायर पंक्‍चर दुरुस्तीचे दुकान आहे. त्यांच्या एका मुलीचा विवाह झाला आहे. दुसरी मुलगी बारावीत शिक्षण घेते. पंधरा वर्षांचा मुलगा नववीमध्ये शिकत आहे. डाके दाम्पत्याच्या अपघाती मृत्यूमुळे हे कुटुंब पोरके झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या 'महादेवी'साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT