Nipani : लाल चिखल झालेल्या टोमॅटोला भाव sakal media
पश्चिम महाराष्ट्र

Nipani : लाल चिखल झालेल्या टोमॅटोला भाव

भाव कमालीचा घसरल्याने दोन महिन्यापूर्वी रस्त्यावर पडून लाल चिखल झालेल्या टोमॅटोची सध्या आवक कमालीची घटली आहे

अशोक परीट

निपाणी : भाव कमालीचा घसरल्याने दोन महिन्यापूर्वी रस्त्यावर पडून लाल चिखल झालेल्या टोमॅटोची सध्या आवक कमालीची घटली आहे. परिणामी मंडईत त्याचा भावही तितकाच वधारला आहे‌. काही दिवसांपूर्वी ६ ते १० रुपये किलोने मिळणारा टोमॅटो आता सफरचंदाच्या भावात ८० ते १०० रुपये किलोने विकला जात आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या आहारातून टोमॅटो सध्या गायब झाला आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने झोडपल्याने टोमॅटो उत्पादनावरच गंभीर परिणाम झाला. त्यात बदलत्या प्रतिकूल हवामानाची भर पडली. परिणामी टोमॅटो उत्पादन कमालीचे घटले. त्यामुळे स्थानिक परिसरातील आणि बाहेरूनही येथील घाऊक बाजारात येणाऱ्या टोमॅटोची आवक गेल्या पंधरा दिवसात कमालीची घटली आहे.

घाऊक बाजारात येणारा टोमॅटो ४०० ते ६०० रुपयांना दहा किलो या प्रमाणात उपलब्ध होत आहे, तर तोच टोमॅटो किरकोळ बाजारात साठ ते ऐंशी रुपयांना किलो या दराने विकला जात आहे. उपलब्ध असेल तर उत्तम प्रतीचा टोमॅटो १०० रुपये किलोनेही विकला जात आहे.

'टोमॅटोचे उत्पादनच नसल्याने भाव वाढूनही त्याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होत नाही. ग्राहकांनाही फटका बसला आहे. आता नवीन लावणीचा टोमॅटो बाजारात आल्यानंतरच त्याचे भाव कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल. त्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागेल.'

-सलीम बागवान, घाऊक भाजी विक्रेता, निपाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT