Travel from Pune to Siload 
पश्चिम महाराष्ट्र

लॉकडाऊन ः एक प्रवास...मरणाच्या दारातून मृत्यूच्या दाढेत

विनायक दरंदले

सोनई : गावाकडे आई आजारी असल्याचा निरोप येतो. लॉकडाऊनमुळे कोणतेच वाहन मिळेना. पायी जायचं तर पत्नी तीन चिमुरडी चालणार कशी... या विचारात ते कुटुंब होतं. पुण्यात रहावं तरी कोरोनाची भीती. त्यात कामही नसल्याने, उपासमार, अस्वस्थता आणि जायचं तेही सुखाचं नाही. शेवटी ठरतं जायचं. आणि सगळेच निघतात प्रवासाला. मजलदरमजल करीत ते आलेत १६० किलोमीटरची पायपीट करून. एकंदरीत मरणाच्या दारातून निघून मृत्यूच्या दाढेत निघालेत.

रोज कोणी ना कोणी असे नगर-औरंगाबाद रस्ता, नगर-सोलापूर, नगर-मनमाड रस्त्याने जाताना दिसत आहे. वाहने नाहीत. त्यामुळे त्यांना मदत तरी कोण करणार आणि केली तरी त्याला कोरोनाची भीती. सोशल डिस्टन्सिंगने हे असं माणुसकीतही अंतर पाडलंय. कोरोना केवळ माणसंच नाही तर माणुसकीही मारतो आहे.

त्या सिल्लोडच्या मजूर कुटुंबाने पत्नी, तीन मुले व तुटका-फुटका संसार डोक्यावर घेवून पायपीट सुरू केली. बारा मुक्कामानंतर हे कुटूंब आज वडाळाबहिरोबा येथे पोचले, भाऊराव व त्यांच्या पत्नी ललीता सोनावने अनापुर (जि.पुणे) येथे मोलमजूरी करत होते.

बहीण यशोदा शेजूळ यांनी फोन करुन आई अनुसया आजारी असल्याचे सांगितले. या निरोपानंतर ते पत्नी ललिता मुलगा रोहित(वय-7),रविंद्र(12)अर्चना (वय-10)सह भांडेकुंडे घेवून जाण्यासाठी रस्त्यावर येवून उभे राहिले. कोरोना स्थितीमुळे त्यांना कुठले वाहनही मिळेना.आठ तास थांबून अखेर सारं कुटूंब पायी प्रवास सुरू केला.

28 मार्चला संध्याकाळी सहा वाजता निघालेल्या या कुटुंबानी बारा मुक्काम करत आज सायंकाळी वडाळाबहिरोबा (ता.नेवासा) हे गाव गाठलं. एकशे साठ किलोमीटर पायी प्रवास करुन आलेले सर्व जण झाडाच्या सावलीत विसाव्यास थांबले असता, आधार सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मोटे यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना अंघोळीला पाणी, भोजन दिले. बरोबर बिस्किट,फळे सकस आहार देत सर्वांना प्रवरासंगमपर्यंत एका वाहनातून सोडले.

चिमुकल्याचे पाय सुजलेत

या कुटूंबास वागीभराडी (ता.सिल्लोड) ला जायचे आहे. त्यांना आज रात्री कायगाव टोका येथे अडकले आहेत. औरंगाबाद हद्दीतील पोलिसांनी अडविल्याने ते सर्व जण एका बंद दुकानाच्या पडवीत आसरा घेवून थांबले आहेत. मुलांचे पाय सुजून तळपायाला फोड आले आहेत. भाऊराव सोनावने आईच्या तर मुले आज्जीच्या ओढीने मजल दरमजल करत आहेत. बारा दिवसाच्या प्रवासाने थकलेल्या व अनंत यातना सहन केलेले  कुटूंब आईच्या कुशीत अजून किती दिवसानंतर जाणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 7 वर्षं गुहेत जगली, मुलींना कसं सांभाळलं? किराणा कशी आणायची... संपूर्ण कहाणी ऐकून बसेल धक्का, रशियन महिलेचा व्हिडिओ

माेठी चाेरी! 'राहुरीतील सराफा दुकान फाेडले'; ३२ तोळे सोने, ३० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० लाखांचा ऐवज चोरीस

BSE Bomb Blast Threat : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बीएसईच्या वेबसाईटवर ईमेल अन् पोलिस अलर्टवर

'हॅरी पॉटर' टीव्ही मालिकेतील हॅरी पाहिलात का? फस्ट लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बालपणाची आठवण येईल

Vilas Bhumre: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री, संभाजीनगरकडे विशेष लक्ष देणार

SCROLL FOR NEXT