truck
truck 
पश्चिम महाराष्ट्र

विजापूर नाक्‍यावर चालकाशिवाय चालला ट्रक! 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : विजापूरहून सोलापूरच्या दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने विजापूर नाका परिसरात सायकलस्वारास धडक दिली. या अपघातात आपल्या ट्रकखाली सायकलस्वार चिरडल्याच्या भीतीने चालकाने चालत्या ट्रकमधून उडी मारून पळ काढला. चालकाशिवाय ट्रक काही अंतर चालला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 19 दुचाकी वाहनांना ठोकरले. 

गुरुवारी रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटांनी हा थरार घडला. विजापूर रस्त्यावरून शहराच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. आरजे 05 जीए 5459) विजापूर नाका परिसरात सायकलस्वारास धडक दिली. या अपघातात ट्रकखाली सायकलस्वार चिरडला गेल्याच्या भीतीने चालकाने मागे-पुढे न पाहता चालत्या ट्रकमधून उडी मारली आणि पळ काढला. चालकाने उडी मारल्यानंतर ट्रक तसाच काही अंतर पुढे गेला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 19 दुचाकी वाहनांसह एक कार आणि एका रिक्षाला ट्रकने धडक दिली. ट्रकमध्ये चालक नाही हे लक्षात येताच सचिन काशीद या नागरिकाने धाडसाने ट्रकमध्ये चढून वाहन नियंत्रणात आणले. तोवर परिसरात गोंधळ उडाला होता. 

ट्रक चालक नेमसिंग नेवाराम सक्‍सेना (वय 55, रा. आग्रा) यास आयटीआय पोलिस चौकीच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात जखमी झालेल्या सुनील बाळकृष्ण कुलकर्णी (वय 68, रा. राजस्व नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. 

अपघात मोबाईल कॅमेरा, सीसीटीव्हीत कैद 
विजापूर नाका परिसरात ट्रकने सुनील कुलकर्णी यांना धडक दिल्यानंतर काही तरुणांच्या मोबाईलमध्ये चालकाशिवाय पुढे जाणाऱ्या ट्रकचे चित्रीकरण झाले आहे. सोबतच परिसरातील दुचाकांसमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ट्रकचा थरार दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT