Two killed as car hit sugarcane trolley
Two killed as car hit sugarcane trolley 
पश्चिम महाराष्ट्र

कारची ऊसाच्या ट्रॉलीला धडक बसल्याने अपघात; दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा
कुर्डुवाडी (सोलापूर) : कुर्डुवाडी- बार्शी रस्त्यावर ऊसाच्या ट्रॉलीला कारची जोरदार धडक बसल्याने कारने पेट घेतला. हा अपघात एवढा भीषण होता की, कार ट्रॉलीच्या खाली घुसुन अडकली व कारमधील दोघेजण जागेवरच ठार झाले. ही घटना चिंचगाव (ता. माढा) परिसरात रविवार (ता. २९) रात्री ११ च्या सुमारास घडली. अविनाश मलप्पा गिराम (वय २८, रा. रायगव्हाण, ता. कळंब) व काकासाहेब सुरेश राऊत (वय ३३, रा. पिंपरी, ता. कळंब) अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सदर दोघेजण भाचीच्या लग्नासाठी स्थळ पाहण्यासाठी पुणे येथे गेले होते. तेथून परतत असताना चिंचगाव जवळ कारने पुढे असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिली. यामध्ये कारने पेट घेतला. कारचे दरवाजे बंद झाल्याने दोघांना बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. परिसरातील अनेक ग्रामस्थ तेथे मदतीसाठी पोहोचले. हर्षल बागल, नगरसेवक आनंद टोणपे, चंद्रकांत वाघमारे, महेंद्रदादा पाटील यांचेसह उपस्थित नागरिकांनी यावेळी मदत केली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. कुर्डुवाडी नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी पोहोचली. सुमारे अर्ध्या तासानंतर आग विझवण्यास यश आले. हा थरार सुमारे दिडतास सुरु होता. अपघात एवढा भीषण होता की कार ट्रॅक्टर ट्रॉली खाली घुसुन लगेच पेट घेतला. अल्पावधीतच कार जळुन गेली. कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT