two motor theft in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक : लाॅडाऊन शिथील होताच सुरू झाल्या आहेत 'या' भयानक घटना 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : लॉकडाउन शिथिल होताच चोरटे देखील आता सक्रिय झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी चोरीच्या घटना घडत असून रविवार (ता.31) रात्री ओल्ड पीबी रोडवरील रामचंद्र इंजिनिअरिंक वर्क्‍समधील विहिरीतील दोन पाण्याच्या मोटारी चोरण्यात आल्या आहेत. तीस हजार रुपये किमतीचे विद्युत मोटारी चोरण्यात आल्या असून या परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडल्या आहेत.

उड्डाण पुलाखालील परिसरात म्हणजे मद्यपींचा अड्डाच बनला असून देखील पोलिसांनी मात्र, याकडे डोळेझाक केली जात आहे. 

लॉकडाउन काळात लोकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे दिड महिने लोक घरातच बसून होते. केवळ अत्याश्‍यक, जिवनावश्‍यक आणि पोलिसांव्यतरिक्‍त अन्य कोणीही रस्त्यावर दिसत नव्हते. पोलीस रात्रिंदंवस गस्तीवर असल्याने चोरीच्या घटनात देखील घट झाली होती. त्यानंतर अलिकडे लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. लोक सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत घराबाहेर पडत आहेत. बाजारपेठ आणि व्यवहार देखील सुरळीत सुरु आहेत. सायंकाळी सात नंतर जमावबंदी असल्याने साडेसानंतर पोलीस नागरिकांना घरी जाण्याची सूचना करीत आहेत. त्यातच मद्याचीही दुकाने सुरु असल्याने मद्यपी दारु घेउन निर्मनुष्य ठिकाणी जाउन दारु ढोसत आहेत. 

पोलिसांची रात्रीची गस्त काही प्रमाणात कमी झाले असल्याने चोरट्यांचे फावले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत. ओल्ड पीबी रोडवरील उड्डाण पुलाखाली असलेल्या आवस्थापनामध्ये सातत्याने चोरीच्या घटना घडल असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी रात्री चोरट्यांनी मानिकबाग शोरुमच्याबाजुला असलेल्या रामचंद्र इंजिनिअरिंग वर्क्‍समधील विहिरीत सोडण्यात आलेल्या दोन विद्युत मोटारी लांबविल्या आहेत. पाण्याच्या पाईप कापून तेथेच सोडून देउन चोरट्यांनी पलायन केले. आज सकाळी ही घटना उघडकीस येताच घटनेची माहिती मार्केट पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला. पण, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Election 2025 : शहर पक्षी निवडणुकीवर स्थलांतरित पक्ष्यांची नजर; बॅलेटसह डिजिटल प्रचारावर भर, कुठं सुरु आहे निवडणूक?

IND vs SA: संघ निवड ते अष्टपैलू खेळाडूंचा हट्ट... भारतीय संघाला द. आफ्रिकेविरुद्ध व्हाईटवॉश मिळण्यामागची ५ कारणे

Chandrashekhar Bawankule: वाईच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देऊ: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; भाजपच्या उमेदवाराला साथ देण्याचे आवाहन

Latest Marathi News Live Update : : माजी आमदार निर्मला गावित यांच्या अपघातामागे कोणताही कट नाही - पोलिस

26/11 Mumbai Attack: सीएसएमटीची सुरक्षा एका मशीनवर, टर्मिनसवर एकच स्कॅनर; २६/११ सारखा हल्‍ला झाल्‍यास प्रत्‍युत्तर देणार कसे?

SCROLL FOR NEXT