पश्चिम महाराष्ट्र

ही ईज नाॅट सपाेझ टू ऍक्‍ट शिवतारेंचा उदयनराजेंना टाेला

सिद्धार्थ लाटकर

सातारा ः खासदार उदयनराजे भाेसले हे जनसेवक असले तरी ही ईज नॉट सपोझ टू ऍक्‍ट. हि ईज नॉट सपोझ टू. काल झाले ते सुद्धा चुकीचे झाले. मुख्य सचिवांच्या सहीने कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकाळात सुद्धा टंचाई आढावा बैठका घेण्याचे अधिकार विरोधी आमदार, खासदार यांना नव्हते. अडचणीच्या काळात त्यांनी मदत करण्याची भुमिका ठेवावी असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी (मंगळवारी) टंचाईची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर गैरप्रकाराचे आरोप केले. त्यावर शिवतारे म्हणाले त्यांनी समोर आणावे, जबाबदारीने. मला एक ही गैरप्रकार दिसत नाही. नुसतं तोंडी द्यायचे. एवढा चांगल काम करीत आहेत सर्वजण. रात्री दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी काम करीत असतील आणि त्यावर जर कोणी आक्षेप करीत असतील निव्वळ पब्लिसिटी स्टंट म्हणून तर तो मी बिलकूल खपवून घेणार नाही. त्यांनी गैरप्रकाराबाबत लेखी द्यावे, तोंडी नव्हे.

खासदार भोसले यांनी बैठकीत पाण्याचा हिशोब मागितला यावर मंत्री शिवतारे म्हणाले हि ईज नॉट सपोझ टू ऍक्‍ट. हि ईज नॉट सपोझ टू. काल झाले ते सुद्धा चुकीचे झाले. मुख्य सचिवांच्या सहीने कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकाळात सुद्धा एक परिपत्रक काढलेले आहे. विरोधी आमदार, खासदार यांनी निवेदने द्यावेत. परंतु बैठका घेऊन सूचना केल्याने संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे विरोधकांनी हा प्रकार करु नये यासाठी ते परिपत्रक आहे. जनसेवक, लोकसेवक म्हणून त्यांना अधिकार आहे. त्यांनी निवेदन द्यावे. कोठे गैरप्रकार होत असतील तर त्यांनी निवेदन द्यावे. पण जाहीर निवदेन करणे चुकीचे आहे. यामुळे चांगले काम करणारे संस्था, अधिकारी यांचे खच्चीकरण होते. एकतर अडचणीचा काळ आहे यामध्ये मी मदत करु शकतो काही असे सकारात्मक म्हणण्यापेक्षा आरोप करणे फार सोपे आहे.

माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या तलाठी, अधिकाऱ्यांना चप्पलने मारा असे वक्तव्य केले आहे. याबाबत शिवतारे म्हणाले चप्पलने मारा असे म्हणणे चुकीचे आहे. भ्रष्टाचार होऊ नये हे आमचे म्हणणे आहे. परंतु भ्रष्टाचार होत आहे असे म्हणणे वेगळे आहे आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला चप्पलने मारावे हे बरोबरच आहे अशी पाठराखण शिवतारेंनी नाईक-निंबाळकर यांची केली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT