Uddhav Thackeray Visit Farmers In Vita Sangli District
Uddhav Thackeray Visit Farmers In Vita Sangli District  
पश्चिम महाराष्ट्र

ठाकरेंच्या भेटी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

सकाळ वृत्तसेवा

विटा ( सांगली) - खानापूर तालुक्यातील विटा व कडेगांव तालुक्यातील नेवरी येथे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या टोमॅटो, द्राक्ष व डाळिंब बागांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकरी भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभारले. त्यावेळी श्री. ठाकरे यांनी शेतकऱ्यांनो खचून जावू नका, धीर धरा. राज्यपालाकडे पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली. 

पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनेतर्फे खानापूर रस्त्यालगत मदत केंद्र सुरू केले आहे. या सहायता मदत केंद्रास श्री. ठाकरे यांनी भेट दिली. त्यावेळी शेतकऱ्यांनी द्राक्ष, सोयाबीन, कडधान्य, डाळिंब पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

यावेळी सुळेवाडी येथील दादासो पवार या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने श्री. ठाकरे यांच्यासमोर बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी श्री. ठाकरे यांनी धीर धरा असे खचून जावू नका, असे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी १५ मेपासून विद्युतपंप सुरू केले नाहीत. विज बिलात मदत मिळावी, अशी मागणी केली.

राज्यपालांकडून नुकसान भरपाई मिळवून देवू

श्री. ठाकरे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. सत्ता स्थापनेचे घोडे अडले असले तरी राज्यपालाकडून नुकसान भरपाई मिळवून देवू. 

यावेळी आमदार अनिल बाबर, माजी जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खासदार विनायक राऊत, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, आमदार मोहनराव कदम, विश्वजीत कदम, नितीन बानुगडे- पाटील, प्रकाश शेंडगे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, अमोल बाबर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, तानाजी पाटील, आण्णासो पत्की यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT