पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यातील भरतगावात 'मोबाईल सोडा मैदान जोडा' हा अनोखा उपक्रम

सुनील शेडगे

नागठाणे : मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे तरुण पिढीचे खेळाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचा तरुणांच्या मानसिक, शारीरिकतेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, भरतगाव (ता. सातारा) येथील युवकांनी 'मोबाईल सोडा मैदान जोडा' हा उपक्रम हाती घेतला आहे.

मोबाईलचा अतिरेकी वापर हा सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला आहे. ही समस्या केवळ शहरी भागातच नव्हे, तर अगदी खेडोपाडीही भेडसावताना दिसत आहे. एरवी सकाळ- संध्याकाळी गर्दीने गजबजलेले ग्रामीण भागातील पारदेखील आता ओस पडलेले दिसतात. ग्रामीण भागाची ओळख असलेल्या तालिमींनाही आता घरघर लागली आहे. तरुण पिढी मोबाईलच्या विळख्यात सापडली आहे. मैदानी खेळांचे दर्शन अभावानेच घडते आहे. या पार्श्वभूमीवर भरतगावच्या युवकांनी खेळाला प्रोत्साहन मिळावे, तरुण वर्ग खेळाकडे आकृष्ट व्हावा यासाठी पुढाकार घेतला आहे.

या उपक्रमाचा भाग म्हणून व्हाॅलीबाॅल मैदानाची निर्मिती केली आहे. या मैदानाचे उद्घाटन मुंबई अग्निशामक दल संघाचे व्हाॅलिबाॅलपटू विजय शेडगे, बातमीदार सुनील शेडगे, किसन कदम, विश्वास देशमुख यांच्या हस्ते झाले, या वेळी नीलेश कदम, शांतिकुमार शेडगे, रमेश शेडगे, समाधान शेडगे, अमोल शेडगे, प्रशांत शेडगे, सुनील देशमुख, सुनील वि. शेडगे, बबन शेडगे आदींची कार्यक्रमास उपस्थिती होती. भरत भोसले, सूरज कणसे, विजय जाधव, अजय शेडगे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

विविध उपक्रमांचे आयोजन
या उपक्रमांतर्गत व्हाॅलिबाॅलसह उंच उडी, लांब उडीसारख्या विविध खेळांची मैदाने तयार करण्यात येणार आहेत. सिंगल बार, डबल बार बसविण्यात येणार आहेत. व्यायामाचे साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अमोल शेडगे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT