पश्चिम महाराष्ट्र

एक दुसरे से करते है प्यार हम...उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंच जमलं

सिद्धार्थ लाटकर

सातारा - आम्ही दोघे पवार साहेबांचे नेतृत्व मानणारे आहोत, तसेच तालुक्‍यातील संघर्ष टाळण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमच्या एकत्र येण्यामध्ये दुसरा कोणताही स्वार्थ नाही. कटू प्रसंग टाळून पुढे जायचे असते. त्यामुळेच साताऱ्याच्या विकासाला गती मिळू शकेल, असा सूर आज खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोगतातून व्यक्‍त झाला.

येथील कल्याण रिसॉर्ट येथे खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांचे नेतृत्व मानणाऱ्या सातारा शहर व तालुक्‍यातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यासह सातारा विकास आणि नगर विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ""आम्ही दोघे पवार साहेबांचे नेतृत्व मानणारे आहोत, तसेच तालुक्‍यातील संघर्ष टाळण्यासाठी एकत्र आलो आहोत. मनोमिलनाच्या काळात चांगली कामे झाल्याचे सर्वश्रुत आहे. (कै.) भाऊसाहेब महाराज यांच्या घराण्याने पक्षनिष्ठा काय असते हे कॉंग्रेसमध्ये असल्यापासून दाखविले आहे. त्यांच्या शिकवणीनुसार आणि पवार साहेबांचे नेतृत्व अधिक बळकट करण्यासाठी, उदयनराजेंना सातारा- जावळीतील आपले कार्यकर्ते सर्वाधिक मताधिक्‍य देतील याची मी ग्वाही देतो.'' आमच्या दोघांमध्ये कटूता निर्माण करण्यासाठी कोणीही प्रयत्न केल्यास त्या प्रवृत्तीस वेळीस ठेचले जाईल, असेही आमदार भोसले यांनी स्पष्ट केले.

उदयनराजे म्हणाले, ""माझी निवडणूक आहे म्हणून आम्ही एकत्र येतोय असा समज कोणीही करून घेऊ नका. गेल्या 10 वर्षांत सर्वांनी मला खूप प्रेम दिले, सहकार्य केले. तुमची अधिकाधिक सेवा करण्याची संधी मिळावी एवढीच अपेक्षा बाळगतो. विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारांचा प्रचार करणार का, अशी शंका उपस्थित केली जाते; पण मी तर आजच घोषित करून टाकतो, की सगळे आमदार निवडून आलेत.''

टॉम ऍण्ड जेरीची जोडी....

या कार्यक्रमात ये बंधन ताे प्यार का बंधन है हे गाणे वाजविण्यात आले. आमदार शिंदे यांनी उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंची जोडी राम- लक्ष्मणाची, तर शिवेंद्रसिंहराजेंनी कलियुगातील मुकेश व अनिल अंबानींची जोडी असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले. तोच धागा पकडत उदयनराजेंनी आमची जोडी टॉम ऍण्ड जेरीची असल्याचे म्हटले. ते म्हणाले आमचं असे आहे तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. त्या वेळी उपस्थितांनी शिट्या व टाळ्यांचा गजर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT