पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : जयंतरावांच्या 'या' विरोधकाचा शिवसेनेत प्रवेश

महादेव अहिर

वाळवा - विधानसभा निवडणूकीसाठी इस्लामपूर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे हुतात्मा उद्योग समुहाचे युवा नेते गौरव नायकवडी यांची उमेदवारी अखेर निश्‍चित झाली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत श्री. नायकवडी यांनी आज मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. सेनेचे नेते लिलाधर डाके, जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, राहुल महाडिक, अमोल पडळकर, भीमराव माने यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या घडामोडीमुळे विधानसभा निवडणूक जयंत पाटील विरुध्द गौरव नायकवडी अशी निश्‍चित झाली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून गौरव नायकवडी उमेदवारीसाठी मुंबईत तळ ठोकून होते. प्रामुख्याने भाजपकडून उमेदवारीसाठी त्यांचा प्रयत्न सुरु होता, मात्र इस्लामपूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे श्री. नायकवडी यांना शिवसेनेत प्रवेश करणे हा एकमेव मार्ग होता. त्यानुसार ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर श्री. नायकवडी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शह देण्यासाठी भाजप - शिवसेनेसह इतर विरोधी पक्ष या निवडणूकीत कमालीचे एकवटले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सर्वपक्षीय एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी विरोधकांनी गेल्या आठ दिवसांपासून सुरु केला होता. त्याचाच भाग म्हणून इस्लामपूर मतदारसंघात आणि मुंबईत या गटाच्या भाजप - शिवसेनेतील बड्या नेत्यांसमवेत बैठका झाल्या आहेत.

तालुक्यात हुतात्माचा पारंपारिक विरोधी म्हणून जयंत पाटील मानले जातात. जयंत पाटील व त्यांच्या गटाला हुतात्माने नेहमीच कडवा विरोध केला आहे. अनेक निवडणूकीत याचा अनुभव मतदारसंघाने घेतला आहे. गौरव नायकवडी यांनी भाजपची राज्यात सत्ता आल्यापासून या पक्षाचे विविध मंत्री आणि थेट मुख्यमंत्र्यांशी घरोबा निर्माण केला आहे.

तालुक्यातील प्रमुख राष्ट्रवादी विरोधकांमध्ये सध्या गौरव नायकवडी मानले जातात. कोणत्याही स्थितीत निवडणूक लढायची या उद्देशाने श्री. नायकवडी यांनी गेल्या पाच वर्षापासून तयारी सुरु केली आहे. जयंत पाटील विरोधकांमध्ये नसलेली एकवाक्यता गौरव नायकवडी यांच्या उमेदवारीने पुन्हा तयार होईल. सध्या भाजपातर्फे इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. मात्र मुंबईतून त्यांचीही मनधरणी भाजपच्या बड्या नेत्यांनी केल्याचे समजते. आत्तापर्यंत मतदारसंघातील विरोधकांना विखरुन ठेवण्यात जयंत पाटील यशस्वी झाले आहेत.

या निवडणूकीत मात्र राष्ट्रवादी विरोधकांची मोट सध्या तरी मजबूत झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

गौरव नायकवडी शिवसेनेच्या कुटुंबात आले आहेत. कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे त्यांचाही सन्मान केला जाईल.

- उध्दव ठाकरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT