पश्चिम महाराष्ट्र

वाहतूक नियमांचा धाकच नाही 

तात्या लांडगे

सोलापूर : यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत राज्यातील तब्बल 76 लाख 52 हजार 696 जणांवर दंडात्मक कारवाया केल्या आहेत. त्यांच्याकडून 130 कोटी 59 लाख 57 हजार 844 रुपयांचा दंड वसूल केला आहे. दुसरीकडे यंदा तब्बल 29 हजार 763 अपघात झाले असून त्यामध्ये 10 हजार 691 जणांचा मृत्यू झाल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले. 

अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतूक सुरळीत व्हावी, वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस, आरटीओ आणि महामार्ग पोलिसांकडून नियंत्रण ठेवले जाते. दुसरीकडे मात्र, अपघातांबरोबरच राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) 49 ने वाढले असून सद्यस्थितीत 1324 ब्लॅक स्पॉट आहेत. बहुतांशी ठिकाणी काहीच उपाययोजना केल्याचे दिसून येत नाहीत. महामार्ग पोलिसांच्या माहितीनुसार त्या ठिकाणांवर सरासरी दरमहा एक हजार लोकांचा मृत्यू होतो तर दुसरीकडे तीन हजार जण जखमी होतात, असे स्पष्ट होते. मोबाईल टॉकिंग, विना परवाना, विना हेल्मेट वाहन चालविणे, मद्यधुंदीत वाहन चालविणे, अतिवेग, क्षमतेपक्षा अधिक माल अथवा प्रवाशी वाहतूक अशा प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचेही दिसून येते. 

कारवाया करुनही वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून अपघाताच्या तुलनेत सोलापूर राज्यात अव्वल आहे. त्याचे प्रमाण कमी करणे आणि वाहनचालकांना स्वयंशिस्त लावण्याबरोबरच दंडात्मक कारवाया करणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबीत करण्याची कारवाई कडक केली जात आहे. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर 

आकडे बोलतात... 
(2017) 
एकूण अपघात 
35,853 
मृत्यू 
12,264 
जखमी 
32,128 
दंडात्मक कारवाया 
93,25,499 
दंड वसूल 
174.51 कोटी 

(2018) 
एकूण अपघात 
29,763 
मृत्यू 
10,691 
जखमी 
26,406 
दंडात्मक कारवाया 
76,52,696 
दंड वसूल 
130.60 कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT