Watch on four men who came from overseas at Shrigonda 
पश्चिम महाराष्ट्र

CoronaVirus : श्रीगोंद्यात परदेशातून आलेत चौघे, आरोग्य विभागाची पाळत

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परदेशातून काही दिवसांपूर्वी परतलेल्या श्रीगोंद्यातील त्या चौघांवर प्रशासनाने विशेषत: आरोग्य विभागाने करडी नजर ठेवली आहे. हे सर्वजण कोरोना निगेटिव्ह असले तरी प्रशासनाने त्यांच्यावर काही बंधने घातली अाहेत.
कोरोना व्हायरसने सगळीकडे हाहाःकार माजवला असतानाच ग्रामीण भागातही त्याची दहशत आहे. श्रीगोंद्यात परप्रांतीय लोक कामानिमित्त आले आहेत. त्यांच्या येण्याजाण्याने समान्यांसह शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीत प्रशासन अतिशय चोखपणे काम करीत आहे.

महसूल विभाग आरोग्य विभाग व पोलिस यंत्रणा एकत्रितपणे जनजागृती करीत आहेत. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालय यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यंत्रणा करीत आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात श्रीगोंद्यात वेगवेगळ्या गावातील ग चौघेजण परदेशातून आलेले आहेत.

या चौघांवर यंत्रणेची नजर आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ व स्थानिक पातळीवर या चौघांची तपासणी झालेली अाहे. चौघेजण कोरोना टेस्टमध्ये निगेटिव्ह आहे. तरीही आरोग्य विभाग याची खास काळजी घेत असून या चौघांनाही गर्दीत फिरू नये यासह इतर सक्त सूचना केलेल्या आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, श्रीगोंद्यात सद्यस्थितीत प्रशासन व सामान्य जनता यांचा समन्वय असून खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून आलेले सगळे लोक निगेटिव्ह आहेत. त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत. परप्रांतातून व शहरातून येणाऱ्या लोकांमुळे अडचणी होऊ नयेत याची काळजी घेतली जात आहे. विनाकारण मास्क लावून कुणीही फिरू नये. आजारी व्यक्ती आणि रुग्णालयातील कर्मचारी यांनीच हे मास्क वापरावेत असे आवाहन त्यांनी केले.

जाहीर मतप्रदर्शन नको
कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. सामान्यांकडून त्याला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना आहे की नाही याबद्दल खाजगी लोकांनी कुठल्याही प्रकारचे जाहीर मतप्रदर्शन करू नये. 
महेंद्र माळी, तहसीलदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT