Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरच्या समांतर जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटी कंपनीकडे 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : उजनी ते सोलापूरदरम्यान समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीमार्फत करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे  पाठविण्यात आला आहे. त्याचवेळी या कामाचा सुधारीत आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.

सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उजनी धरण ते सोलापूरदरम्यान 110 दशलक्ष लिटर क्षमतेची समांतर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी 449.64 कोटी रुपयांच्या कामाचे प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहेत. ते काम स्मार्ट सिटी कंपनीकडून करून घेण्यास नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.  या कामासाठी एनटीपीसीकडून 250 कोटीरुपये काम होईल त्यानुसार उपलब्ध होणार आहेत. ती टप्प्या टप्प्याने स्मार्ट सिटी कंपनीला उपलब्ध करून दिेले जाणार आहेत. 

पहिल्या टप्प्यात 449.64 कोटींचे काम केले जाणार आहे. त्यासाठी एनटीपीसीकडून 250 कोटी रुपये आणि स्मार्ट सिटी कंपनीकडून 200 कोटी असे एकूण 450 कोटी रुपयांतून ही कामे केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून घेण्यात आले आहेत. त्याचवेळी दुसऱ्या टप्प्यातील कामांचा सुधारीत आराखडा तयार करणे व तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. ही योजना राबविण्यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याची शिफारस करण्यात आली असून, त्यास मंजुरी देण्यासाठी प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला आहे. 

पहिल्या टप्प्यात होणारी कामे 
- उजनी धरणात जॅकवेल बांधणे 
- पंपींग मशनिरी बसविणे 
- उजनी ते पाकणी ते सोरेगावपर्यंत जलवाहिनी टाकणे 
- महामार्ग व रेल्वे क्रांसिंगचे कामे पूर्ण करणे 
- एनटीपीसी बाधित तीन गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT