Islampur latest update
Islampur latest update 
पश्चिम महाराष्ट्र

'आम्ही कट्टर शिवसैनिक, जयंत पाटलांनी आमच्यावर अन्याय केला'

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा, तुमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल करणार नाही; शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला.

इस्लामपूर - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचे लोण सांगली जिल्ह्यापर्यंत पोहचले. शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी आपल्या तालुका प्रमुख, इस्लामपूरचे पाच आणि आष्ट्याचे एक नगरसेवकांसह सर्व शिवसैनिकांच्यावतीने एकनाथ शिंदे गटाला आज पाठिंबा दिला. (Islampur latest update)

आम्ही कट्टर शिवसैनिकच आहोत, मात्र राज्यात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचे महाविकास आघाडी सरकार असूनही गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शिवसैनिकांच्यावर मोठा अन्याय केला. पोलिस प्रशासनाला हाताला धरुन शिवसैनिकांच्यावर खुन, मोका या सारखे गुन्हे दाखल केले. तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्यापर्यंत सर्व प्रशासकीय यंत्रणांना शिवसैनिकांना मदत न करण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत असल्याची घोषणा आनंदराव पवार यांनी केली.

ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सांगली जिल्ह्यासह वाळवा तालुक्यात शिवसैनिकांच्यावर राष्ट्रवादीचा अन्याय वाढत गेला. राष्ट्रवादीचे पालक मंत्री जयंत पाटील यांनी कोणत्याही जिल्हा पातळीवरील नियुक्त्यांमध्ये शिवसैनिकांना स्थान मिळू दिले नाही. कायमच दुय्यम वागणूक दिली. विश्वासात घेतले नाही. इस्लामपूर शहरात सुरु असलेल्या भुयारी गटर योजनेमुळे शहरातील रस्ते पुर्णपणे खराब झाले होते. त्यामुळे शहर विकासासाठी नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडून ११ कोटी निधी मंजूर करुन आणला. त्याचे श्रेय शिवसेनेला जाईल म्हणून जयंत पाटील यांनी तो निधी थांबवला.

पालकमंत्री पदाचा गैरवापर करुन युवा सेना व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर ॲट्रासिटी, मोक्यासारखे गुन्हे दाखल केले. तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा, तुमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल करणार नाही असा दबाव आणून सांगली जिल्ह्यातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन शिवसेनेचे कसे खच्चीकरण होईल याचा प्रयत्न वारंवार केला. जिल्हा नियोजन समितीला ३२० कोटी रुपये निधी आला होता, त्यातील ५ कोटी निधी मागूनही शिवसेनेला जाणूनबुजून दिला नाही.

सर्वकाही राष्ट्रवादीच्या कोंबड्याने दिवस उगवला पाहिजे अशी भुमिका पालकमंत्र्यांची आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, आणि कट्टरच राहणार. आमचे बंड शिवसेनेविरोधात नसून आमचे बंड हे आमच्या जीवावर सत्ता भोगणाऱ्या राष्ट्रवादी विरोधात आहे. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख नगरसेवक शकील सय्यद, तालुका प्रमुख सागर मलगुंडे, नगरसेवक प्रदीप लोहार, आष्ट्याचे नगरसेवक वीर कुदळे, दि. बा. पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT