Minister Nitin Gadkari  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Nitin Gadkari : 'झाले बहु, होतील बहु यासम हा' असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व; काय म्हणाले गडकरी?

Minister Nitin Gadkari : ‘राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर संस्कार केले. कुठलीही व्यक्ती जात, पंथ, धर्म, भाषा यांनी मोठा नसतो.'

सकाळ डिजिटल टीम

''छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे नेतृत्व हे भविष्यातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. नवीन पिढीसमोर शिवाजी महाराजांचे कर्तृत्व पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचाही उपयोग केला पाहिजे.''

सांगली : आजच्या राजकारणात जात, पैसा आणि गुन्हेगारी हे घटक बनले असल्याचे दिसत आहे. त्याचे शुद्धीकरण करायचे असेल तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे, गुणवत्तेचे त्यांच्या शासन पद्धतीचे, प्रशासकीय कौशल्याचे अनुकरण राजकारणात असलेल्या लोकांनी जास्त केले पाहिजे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज युगप्रवर्तक राजे होते. त्यांचे गुण जर आपण प्रत्येकाने घेतले तर आपला समाज, देश आज आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे जाईल, असेही ते म्हणाले.

सांगलीत मराठा समाज संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह सर्व समाजाच्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झाले. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, स्वागताध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते. शिल्पकार अमोल सूर्यवंशी यांचा सत्कार झाला.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, देशाच्या इतिहासात ‘‘झाले बहु, होतील बहु यासम हा’’ असे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे स्वराज्य हे सर्वधर्म समभाव सांभाळणारे होते. भूतकाळातल्या इतिहासाचे वर्तमान काळात स्मरण केले तर भविष्यकाळ कसा घडवायचा, याची प्रेरणा त्या इतिहासातून मिळते.’

गडकरी म्हणाले, ‘राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर संस्कार केले. कुठलीही व्यक्ती जात, पंथ, धर्म, भाषा यांनी मोठा नसतो. तो गुणांनी, कर्तृत्वाने मोठा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे नेतृत्व हे भविष्यातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. नवीन पिढीसमोर शिवाजी महाराजांचे कर्तृत्व पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचाही उपयोग केला पाहिजे.

ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, ‘मराठा समाज लढवय्या आहे. सर्वांना बरोबर घेऊन देशाला पुढे नेण्याचे काम मराठा समाज करतोय. सांगलीतही मराठा समाज संस्थेने समाजातील अंधश्रध्दा, चुकीच्या श्रध्दा दूर करण्यासाठी कायमच प्रयत्न केला. सर्वधर्मसमभावासाठी संस्थेचे मोठे योगदान आहे. देशाच्या प्रगतीत योगदान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे विचार बहुजन समाजाला देण्याचे काम संस्था करते आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक राजे होऊन गेले. यातील अनेकांच्या नाव किंवा आडनावाने सत्ता ओळखली गेली. शिवाजी महाराज यांचे राज्य मात्र रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य असे ओळखले जाते.

आमदार विश्वजित कदम म्हणाले की, शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून मराठा समाज जिल्ह्यात कार्यरत आहे. मराठा समाजाची व्याप्ती वाढवावी, त्यासाठी काही निर्णय धाडसाने घ्यावेत. आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, उल्हास पाटील, सदाशिवराव पाटील, दिनकर पाटील, नितीन शिंदे, वैभव शिंदे, पृथ्वीराज पाटील, संग्राम देशमुख, श्रीमती जयश्रीताई पाटील, पद्माराजे पटवर्धन, पद्माकर जगदाळे, दीपक शिंदे, मराठा समाजचे अध्यक्ष अभिजित पाटील, विकास मोहिते, ए. डी. पाटील, प्रमोद शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

पुतळा उद्‌घाटनाला कुणाचा हात ? - कदम

आमदार विश्‍वजित कदम म्हणाले, ‘आज योगायोग आहे, सांगलीत आणि कसबा बावडा येथे शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचे अनावरण होत आहे. मात्र, पुतळ्याला कुणाचा हात लागतो हे महत्त्वाचे आहे. पुतळा कुणी केला, त्याचे शिल्पकार कोण, कोणी बसविला, आणि कुणाच्या हस्ते त्याचे पूजन झाले, हे महत्वाचे असल्याचे सांगत आमदार कदम यांनी सिंधुदुर्ग येथील पुतळा आठ महिन्यांत पडल्याप्रकरणी महायुती सरकारला टोला लगावला.

पवार गेले...गडकरी आले....

कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एकत्रित कार्यक्रम होता. मात्र, शरद पवार नियोजित वेळेवर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. ते कार्यक्रम स्थळावरून गेल्यानंतर पंधरा मिनिटांनी मंत्री गडकरी यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. राजकीय वर्तुळात एकमेकांनी कार्यक्रमांतील भेट टाळली का, अशी चर्चा सुरू होती.

आणि हेलिकॉप्टर थांबले

नितीन गडकरींच्या सांगली जिल्ह्याच्या आज दौऱ्यानंतर परतीच्या प्रवासात हेलिपॅडवर प्रचंड पाऊस असताना चहा घेण्याची उर्मी आली. मग काय नीताताई केळकरांचा चिरंजीव सारंग आणि सून ऐश्वर्या हे धावतच चहाचा सर्व सरंजाम घरातून घेऊन हेलीपॅडवर हजर झाले. बंदोबस्तास असलेले पोलिस असं कधी कोणी चहा पितो काय? तुम्ही काय आणले पिशवीतून असे विचारणा करत होते. तोपर्यंत गडकरींचा ताफा आला आणि सुरेशभाऊंनी कुठे आहे चहा? अशी विचारणा केली आणि नितीन गडकरींनी चहा खारीचा मनसोक्त आस्वाद घेऊन मग ते रवाना झाले. जाताना आवडलेली खारी मागून न्यायला विसरले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT