What a woman did at Pathardi for a husband marathi news
What a woman did at Pathardi for a husband marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

पाथर्डीत महिलेने काय केले नवऱ्यासाठी 

सकाळ वृत्तसेवा

नगर : समाजात आजही महिलांवर अनेक बंधनं आहेत. काही ती मनोभावे पाळतात तर काही ती झुगारून देतात. महिलांनी धर्माचे नियम तोडले की त्यांच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांची कमी नाही. चोहोबाजूंनी त्यांच्यावर आगपाखड केली जाते. पाथर्डीत घडलेला प्रसंग काहीसा असाच, रूढीभंजन. मात्र, त्याचे कौतुक झाले. कोणीही काही आक्षेप घेतला नाही. 

मनसुखजी गांधी सैन्यातून निवृत्त झालेले. पाथर्डीत आपल्या कुटुंबासह रहाण्यास आले. निवृत्तीनंतर त्यांनी कपड्याचा व्यवसाय सुरू केला. गांधी स्वेटरवाले म्हणून ते परिसरात प्रसिध्द होते. पत्नी छायाबाई स्वत: स्वेटर विणायच्या. त्या स्वेटरच्या पैशावर त्यांचा संसार सुरू होता. सर्वकाही सुरळीत चाललेलं असताना अचानक तरणाबांड मुलगा नियतीने हिरावून नेला. 

धार्मिक कार्यक्रमात गाईने धक्का दिला

मुलगा गेल्यावर जगण्यात काही अर्थच नाही, अशी त्यांची भावना झाली. परंतु तरीही त्या धक्‍क्‍याने ते सावरले. एकमेकांना धीर देत जगण्याची उमेद बांधली. दुःखातून बाहेर आल्यावर त्यांनी स्वेटरचा व्यवसाय कमी करत पाथर्डीतच नाथनगर भागात रहात्या घरातच एक छोटे किराणा दुकान सुरू केले. ते धार्मिक स्वभावाचे होते. दोन वर्षापूर्वी एका धार्मिक कार्यक्रमात गाईने धक्का दिला. त्यातून ते जखमी झाले. पण त्यातून सावरलेच नाही. 

छायाबाईंनी पतीच्या चितेस अग्नी दिला

अचानक त्यांनी जगाचा निरोप घेतला. अंत्यविधीची वेळ ठरली, लगबग सुरू झाली. नातेवाईकांनी छायाबाईंचे सांत्वन सुरू केले. त्यांनी मन खंबीर करीत स्वतःच अग्नी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने सर्वच हादरले. कारण महिलांनी अग्नी देण्याची परंपरा नाही. त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. नातेवाईक गावातील पंच कमेटीने रूढी-परंपरांना फाटा देत मोठ्या दिलाने संमती दिली. त्यानंतर छायाबाईंनी आपल्या पतीच्या चितेस अग्नी दिला. ही घटना साधीसुधी नाही. त्यांनी एकप्रकारे रूढीभंजनाची भूमिका पार पाडली आहे. 

सोशल मीडियात स्वागत

समाजात आजही मुलाच्या हट्टापायी स्त्री भ्रूणहत्या होत आहेत. मुलाने अग्नी दिला तरच स्वर्ग मिळतो, हा विचार त्याला कारणीभूत असल्याचे समाजसुधारकांचे म्हणणे आहे. छायाबाईंनी घेतलेल्या भूमिकेचे सोशल मीडियातून स्वागत होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT