While playing in urban areas rural areas started playing in the fields kolhapur marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

बैठे मनोरंजन ; बळीराजा शेतात तर शहरी भाग खेळात लागला रमू ...

शिवाजीराव चौगुले

शिराळा (सांगली) : कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन असल्याने शहरातील  कुटुंब कॅरम,पत्ते तर ग्रामीण भागातील कुटुंब शेतीच्या कामात मग्न दिसून येत आहेत. या लॉक डाऊनच्या वाढत्या काळात घरातील बैठ्या खेळांना जास्त पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे टाईमपास म्हणून मुलांच्या सोबतील आई बाबा ही खेळु लागले आहेत. त्यामुळे शहरांचा टाईमपास खेळात तर खेड्यांचा टाईमपास शेतात असे चित्र पाहवयास मिळू लागले आहे.

व्यापार, शाळा,शासकीय कामे,नोकरी,उद्योग यामुळे आई बाबा नेहमी व्यस असतात. मुले शाळा महाविद्यालयाच्या व खासगी तासांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून क्रिकेट,फुटबॉल,सायकलिंग करतात.आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे संपूर्ण देश थांबला आहे.  फक्त अत्यावश्यक कामाकरीता लोक बाहेर पडू लागले आहेत. उर्वरित लोक आपल्या कुटुंबा सोबत वेळ घालवत आहे.

शहरी भाग खेळात तर ग्रामीण भाग शेतात

बाहेर पडून मैदानी खेळ खेळू शकत नसल्याने. मोबाईल, टीव्हीचा कंटाळा येऊ लागला आहे. त्यामुळे सर्वांना खेळता येईल अशा  कॅरमची आठवण आली असून एरवी मुलांच्या टाईमपासचा कॅरम आता संपूर्ण कुटुंबाचा खेळ बनला आहे.जिथं कॅरम नाही तिथे पत्याचे डाव रंगू लागले आहेत. ग्रामीण भागात शेतीच्या कामांना गती आली असून पेरणी पूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे शहरी भाग खेळात तर ग्रामीण भाग शेतात रमू लागला आहे.


 टाईमपास म्हणून नको करिअर म्हणून खेळा.
कॅरम कडे फक्त टाईमपास म्हणून न पाहता यातून करीयर म्हणून पाहावे.  दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कॅरम कडे क्लब गेम व टाईम पास म्हणून पाहिलं जात. या खेळामधे खूप मोठ्या संधी आहेत. हा खेळ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर १८ ते २० देशात खेळला जातो.याच्या सात जागतिक स्पर्धा झाल्या यात भारत अग्रेसर आहे.  शिवाय महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, महाराष्ट्र. यांच्यावतीनेे राज्यस्तरीय स्पर्धा होत असतात. या खेळाडूंना सरकारी नोकरीत स्थान आहे.
 मोहसीन नदाफ (कॅरम प्रशिक्षक शिराळा) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Injury Updates: मुंबई इंडियन्ससह ८ संघांना बसलाय दुखापतीचा फटका; आतापर्यंत १४ खेळाडूंनी वाढवली फ्रँचायझींची डोकेदुखी

मिरा-भाईंदरमध्ये नवे वाहनतळ उभारणार, वाहतूक कोंडी कायमची फुटणार; पालिकेचा मोठा निर्णय

जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड शहरातील डी. वाय. पाटील रुग्णालयातून ५.२२ लाखांची इंजेक्शने लंपास

Sugar industry: राज्यातील साखर उद्योग सापडला आर्थिक कोंडीत; अनुदानाची टांगती तलवार, ३०० कोटींचा ‘ट्रेझरी’ प्लॅन!

SCROLL FOR NEXT