पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात कॉंग्रेसच्या "या' नेत्याने का केले राजीनाम्याचे नाटक?

संतोष सिरसट

सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा कॉंग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे दिला आहे. मात्र, श्री. म्हेत्रे यांनी त्याचा इन्कार केला आहे. श्री. पाटील यांनी राजीनामा देण्याचे नाटक कशासाठी केले हा संशोधनाचा विषय आहे. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडी नुकत्याच झाल्या. राष्ट्रवादीच्या राज्याच्या नेत्यांनी काहीही झाले तरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष हे महाविकास आघाडीचे झाले पाहिजे असे आदेश दिले होते. मात्र, तशाप्रकारे करण्यात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांना यश आले नाही. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी फाजील आत्मविश्‍वास दाखविल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास भाजप-समविचारी आघाडीने हिरावून घेतला आहे. भाजप-महाविकास आघाडीची सत्ता येण्यास अनेक विषय कारणीभूत ठरले आहेत. 

सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी भाजप-समविचारी आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे अनिरुद्ध कांबळे यांना मतदान केले आहे. कॉंग्रेस पक्षाने व्हीप बजावूनही श्री. पाटील यांनी कांबळे यांना मतदान केले आहे. माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व श्री. पाटील यांचे वडील (कै.) महादेव पाटील यांचे घनिष्ठ संबंध होते. तसेच संबंध मल्लिकार्जुन पाटील यांनीही कायम ठेवले आहेत. ही निवडणूक मोहिते-पाटील यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे मोहिते-पाटलांच्या प्रतिष्ठेला तडा जाऊ नये, यासाठी श्री. पाटील यांनी अध्यक्षपदाच्या निवडीत कांबळे यांना मतदान केले. उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी श्री. पाटील यांनी त्यांचे मित्र व राष्ट्रवादीचे सदस्य विक्रांत पाटील यांना मतदान केले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी वेगवेगळ्या उमेदवारांना श्री. पाटील यांनी मतदान केले आहे. सभागृहात मतदान सुरू होताना कॉंग्रेसचे गटनेते संजय गायकवाड यांनी व्हीप जारी केला होता. मात्र, तो व्हीप झुगारत श्री. पाटील यांनी भाजप-समविचारी आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले आहे. 

राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यायचा असतो 
अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडी झाल्यानंतर काही दिवसांनी श्री. पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे नाटक केले आहे. पक्षाने आपल्यावर काहीही कारवाई करू नये यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आपले नेते माजीमंत्री म्हेत्रे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. पण, म्हेत्रेंना राजीनाम्याच्या बाबतीत काहीच माहिती नाही. त्यामुळे श्री. पाटील यांचे राजीनामा नाट्य हे निव्वळ फार्स असल्याचे स्पष्ट होते. त्यांना खरोखरच राजीनामा द्यायचा होता तर त्यांनी तो माजीमंत्री म्हेत्रे यांच्याकडे देण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडे का दिला नाही असाही सवाल उपस्थित होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT