पश्चिम महाराष्ट्र

डोक्‍यात काठी मारून केला पत्नीचा खून अन्‌ म्हणाला..

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ऊसतोड कामगार असलेल्या पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद झाला. याच वादातून पतीने काठीने मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना चिंचपूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली. या घटनेनंतर पतीने पत्नीस ऊस तोडत असताना चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याचा बनाव केला. पोलिसांच्या चौकशीतून तसेच शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामुळे पतीचा डाव फसला. सामका कृष्णा राठोड (वय 20, रा. कोठाळ, सोनपेठ, जि. परभणी) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणात पती कृष्णा राठोड (वय 25) यास पोलिसांनी अटक केली आहे. 

हेही वाचा - स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीवर आलीय 'ही' दुर्दैवी वेळ!

पत्नी-पत्नीमध्ये नेहमीच वाद
सामका आणि कृष्णा राठोड हे दांपत्य ऊसतोडीसाठी सोलापुरात आले होते. त्यांची ऊसतोड कामगारांची टोळी चिंचपूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील शिवराया कोणदे यांच्या शेतात काम करीत होती. दोघा पत्नी-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून नेहमीच वाद व्हायचे. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाला. या रागातून चिडून पती कृष्ण राठोड याने पत्नी सामका हिच्या डोक्‍यात काठीने जोरात मारले. काठीचा मार जोरात बसल्याने पत्नी सामका हिचा जागीच मृत्यू झाला. 

हेही वाचा - चोरून नेलेली दुचाकी, मोबाईल पाहिजे असेल तर...

खून केल्याची दिली कबुली
यानंतर पत्नी समका ही अचानक चक्कर येऊन पडल्याचा बनाव कृष्णा याने केला. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. सामका हिची तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. यानंतर सामका हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या वेळी मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांनी कृष्णा राठोड याची अधिक चौकशी केली. कृष्णा याने काठीने मारून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी कृष्णा याला अटक केली असून सोमवारी न्यायालयात हजर करणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक धांडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT