Chandoli Sanctuary
Chandoli Sanctuary esakal
पश्चिम महाराष्ट्र

Chandoli Sanctuary : मानव-वन्य प्राण्यांत संघर्ष वाढला; जंगल सोडून प्राणी का पडताहेत बाहेर?

विजय पाटील

वन्य प्राण्यांकडून म्हणजे हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये भीतीचे वातावरण आहे.

पुनवत : चांदोली अभयारण्याबरोबरच (Chandoli Sanctuary) अलीकडच्या काही दिवसांपासून तालुक्यातील शेतशिवारात जंगली वन्य प्राण्यांचा व गावात वानरांचा वावर वाढला आहे. एकीकडे शेतात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे, तर दुसरीकडे वानरांचा धुमाकाळ सुरू असल्यामुळे घरांचे नुकसान होत आहे. जायचं कुठं आणि करायचं काय, अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे.

बिबट्या (Leopard), रानडुक्कर व गव्यांचा शेतशिवारात वावर वाढल्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहत आहेत. वन्य प्राण्यांबरोबरच (Wild Animals) वानरांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने जंगलातील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. बिबट्यासह गव्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढत आहे. पावसासह अन्य हिरवी पिके त्यांच्या जगण्याला पोषक आहेत. लपायलाही भरपूर जागा असल्यामुळे शेतीसह बागायतीचे नुकसान होत आहे.

बिबट्याच्या भीतीने वानरांच्या झुंडी प्रत्येक गावात ठाण मांडून आहेत. त्यांच्यामुळे कौलारू घरे व गावानजीक असलेल्या शेतीचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. तालुक्यातील चांदोली अभयारण्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत विस्तारले आहे. पश्चिम घाट क्षेत्रात असलेल्या वारणा धरणाच्या जलाशय परिसरातील अभयारण्य महत्त्वाचे आहे. वन्यजीवांचे संरक्षण व त्यांना आश्रय देण्याच्या दृष्टीने शासनाने १५ सप्टेंबर १९८५ रोजी चांदोली अभयारण्य घोषित केले, अभयारण्य ३२ गावांच्या कार्यक्षेत्रालगत आहे. क्षेत्रफळ ३०८.९७ चौरस किलोमीटर आहे.

अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वांत मोठे आहे. विकास होण्याच्या दृष्टीने २००४ मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. चांदोली अभयारण्याचे क्षेत्र सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील डोंगररांगा टेकड्यांसह दऱ्याखोऱ्यांनी व्यालेले आहे. समुद्रसपाटीपासून डोंगरांची उंची ५०० ते ९०० मीटर आहे. पश्चिमेकडील सीमा सह्याद्रीच्या उंच कड्यांपर्यंत आहे. चांदोली बुद्रुक, खुंदलापूर, नांदोली, झोळंबी, आंबोली, वेती-निवळे, लोटीव, गवे, चांदोली खुर्द, तर शाहूवाडी तालुक्यात उत्तरेकडील उदगिरी, गोठणे, ढाकाळे, चांदेल, भोगीव, सिद्धेश्वर, रुंदीव येथे जंगल-वनांचे प्रमाण लक्षणीय आहे. गवे-बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांचे हल्ले हा विषय नेहमी चर्चेत असतो.

वनजंगलाचा भूभाग मोठ्या प्रमाणात असल्याने सर्व भागांत वन्य प्राणी व मानव संघर्ष दिवसेंदिवस टोकाचा होऊ लागला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शाहूवाडी तालुक्यातील उखळु येथील आठ वर्षांचा शाळकरी मुलगा जखमी झाला. उदगिरी येथील १० वर्षांची मुलगी मृत्यू पावली. शित्तुर येथील शेतकऱ्याचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शित्तुर येथे एक शेतकरी जखमी झाला. मणदूर येथील ६ नागरिक गव्याच्या हल्ल्यात जखमी झाले. वन्यप्राण्यांचे पशुधनावरही हल्ले सुरूच आहेत.

चव्हाणवाडी व वाकुर्डे (दोन्ही ता. शिराळा) येथे बिबट्याचा मृत्यू होण्याची घटना घडली. रिळे येथे सहा गव्यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी रेठरे (ता. वाळवा) येथील बामणधरा परिसरात मृत व सडलेल्या अवस्थेत बिबट्या आढळला. या घटना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून ३० ते ४० किलोमीटर परिसरात घडत असल्याने जंगलात प्राणी आहेत का? जंगल सोडून बाहेर पडलेत? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे, शेतकऱ्यांचे दैनंदिन जगणे बिबटे, गवे, रानडुकरांच्या व गावातील वानरांच्या झुंडीमुळे त्रासदायक बनले आहे. बिबट्याचे पशुधनावर हल्ले होत होतेच. आता मानवावरील हल्ल्यांत वाढ होत आहे.

उपाययोजनांची गरज

वनविभाग, प्राणिप्रेमी, सेवाभावी संघटना, वन अभ्यासक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी संयुक्तपणे उपाययोजना सुचवल्या पाहिजेत. शासनानेही तारेचे कुंपण घालण्याचा विचार अनेकवेळा बोलून दाखवला. मात्र कृती होत नाही. चर खोदण्याचा मुद्दाही अनेकदा पुढे आला. मात्र कार्यवाही झाली नाही. तारेचे कुंपण करायचे की नाही, हा वादाचा मुद्दा आहे. काही गैरप्रकार घडण्याची भीती जंगल अभ्यासकांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. उपाययोजना करताना माणूस-बिबट्या, गवा यांना सहाय्यभूत असण्याची गरज आहे.

वन्य प्राण्यांकडून म्हणजे हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये भीतीचे वातावरण आहे. अभयारण्याला तारेचे कुंपण, चर खोदणे, जंगलात पाणवठे वाढवणे यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत. गव्याचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने बैठक घेऊन नागरिकांना स्वसंरक्षणार्थ उपाय योजना करण्यासाठी मार्गदर्शन करावे.

-ॲड. मारुती पाटील, उपसरपंच, तडवळे (ता. शिराळा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT