Will ever stop 
पश्चिम महाराष्ट्र

कधी थांबणार चोऱ्या? 

सचिन सातपुते

शेवगाव  : शहरातील बांधकामासाठीचे किमती लोखंडी साहित्य कामाच्या ठिकाणाहून चोरीला जात असून, त्याचा त्वरित तपास लावावा, या मागणीसाठी बांधकाम ठेकेदार व कामगारांनी पोलिस ठाण्यात आज ठिय्या आंदोलन केले. याबाबत योग्य तपास करून चोरांच्या मुसक्‍या आवळण्यात येतील, असे आश्‍वासन पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

ढिकले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शेवगाव शहर व तालुका परिसरात सर्व बांधकाम व्यावसायिक नव्या इमारतींचे बांधकाम करीत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या महागड्या लोखंडी प्लेट, लोखंडी पाइप व अन्य लोखंडी साहित्य बांधकामाच्या साइटवर ठेवलेले असते. मात्र, हे सर्व लोखंडी साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

मागील दोन-तीन महिन्यांपासून रामेश्वर वावरे, नाथा कातकडे, अल्ताफ अब्बास शेख यांच्या लोखंडी प्लेट व अन्य साहित्य चोरीला गेले आहे. याबाबत पोलिस ठाण्यात रीतसर तक्रारही दाखल केली आहे. या चोऱ्यांची वेळीच दखल घेतली असती, तर चोरीला गेलेला माल सापडला असता. मात्र, याबाबत कुठलाही तपास केलेला नाही. त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढत चालले असून, बांधकाम व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 

याबाबत तक्रारीची वेळीच दखल घेऊन चोरांच्या मुसक्‍या आवळाव्यात, अन्यथा बांधकाम व्यावसायिक व कामगार तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

नगरसेवक भाऊसाहेब कोल्हे, रिजवान शेख, आप्पासाहेब मगर, खंडू बुलबुले, राजेंद्र म्हस्के, रावसाहेब घुगरे, नवनाथ कवडे, कानिफनाथ म्हस्के, भाऊसाहेब घुगरे, गोपीचंद सोरमारे, बापू धनवडे, किसन कर्डिले, बाळू राख, शेषराव कर्डिले, बाबासाहेब कोरडे, खंडू काळे, संदीप लवांडे, संजय मिसाळ, रामनाथ केसभट, वसीम पठाण यांच्यासह बांधकाम व्यावसायिक व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

नाेटिसा बजावण्यात येतील ः ढिकले

चोरीला गेलेल्या साहित्याचा योग्य तपास करून चोरांना पकडण्यासाठी पथक तयार केले आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिकांनी सुरू असलेल्या साइटवर विजेच्या दिव्यांची व्यवस्था करणे, साहित्य रूममध्ये ठेवणे, वॉचमन आदी व्यवस्था करावी. मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना याबाबत नोटिसा बजावण्यात येतील. 
- रामराव ढिकले, पोलिस निरीक्षक, शेवगाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Rankings: जो रुट पुन्हा 'अव्वल', संघसहकाऱ्यालाच टाकलं मागं; शुभमन गिल - रिषभ पंतचीही क्रमवारी घसरली

'मला दगडू सारखा 'अडल्ट जोक्स' करणारा मुलगा कधी व्हायचचं नव्हतं' प्रथमेश परब स्पष्टच बोलला

Aquarius Compatibility: कुंभ राशीसाठी 'मेड फॉर इच अदर' कोण? जाणून घ्या राशीनुसार नात्याचं भविष्य

Snake Video : सायलेन्सरमध्ये लपला होता खतरनाक साप, गाडी सुरू होताच पायाला...अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : भाजपची पुण्यात पश्चिम महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित

SCROLL FOR NEXT