A Woman Corporator doing Farming in their Farm
A Woman Corporator doing Farming in their Farm 
पश्चिम महाराष्ट्र

नगरसेविका असूनही 'ती' राबते शेतात !

संजय आ. काटे

श्रीगोंदे, (नगर) : चार वर्षे झाली पालिकेच्या नगराध्यक्ष आहेत. मध्यंतरी विषय समितीच्या सभापतीही होत्या. मात्र, राजकारण, समाजसेवा सुरु असतानाही शेतात कष्ट चुकत नाहीत. पाठीवर औषधाचा पंप घेऊन उन्हाचा विचार न करता दिवसभर औषध फवारणी करणाऱ्या भाजपच्या नगरसेविका संगीता सतीश मखरे यांनी राजकारण्यांपुढे नवा आदर्श घालून दिला आहे. 

मखरे आज त्यांच्या शेतातील कांद्याला स्वत: तणनाशक फवारत होत्या. त्यांना विचारले आपण नगरसेविका असताना अशी शेतातील कष्टाची कामे करण्याची गरज काय आहे ? त्यावर त्या म्हणाल्या, शेती म्हणजे काळी आई आहे. तीत आपण स्वत: राबलो तरच तेथून सोनं पिकते. आता मजुरांची मोठी टंचाई आहे. आमच्याकडे तीन एकर शेती असून, त्यात लिंबू बाग व कांद्याचे पिक आहे. लिंबाच्या झाडांची छाटणी, काढणी त्याच करतात. औषधांची फवारणीही त्याच पाठीवर पंप घेऊन करतात. खुरपणी, कांदा काढणी ही कामे नित्याचीच आहेत.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, स्त्री अबला कधीच नव्हती व कुणी समजूही नये. नगरसेविका आहे, लोकांनी पालिकेत पाठवले. मात्र, ते क्षेत्र सांभाळून शेती पडीक ठेवायची का? त्यावर आपले घर चालते. पती समाजाच्या सेवेत असतात. पालिकेच्या रुपाने दिलेली जबाबदारी मी योग्य सांभाळून शेती व घर पाहते. कशातही कमीपणा वाटत नाही. राजकारण व समाजकारण पाहून इतर वेळ शेतीत देताना जे काम पडेल ते प्रामाणिकपणे करते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT