Work area for 383 Village but employees 21 
पश्चिम महाराष्ट्र

अवघडचंय! कामाचा व्याप 383 गावांचा अन्‌ कर्मचारी फक्त 21

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरसह विभागातील चार तालुक्‍यांतील सुमारे 383 गावांतील शेतीचा डोलारा सांभाळणाऱ्या येथील उपविभागीय कृषी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे येथील कार्यालयातील शेतीविषयक कामे रखडली आहेत. कामे वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांच्या गैरसोयी वाढल्या आहेत. या ठिकाणी सध्या फक्त 21 कर्मचारी आहेत. 

हेही वाचा : बलात्कार्यांचा जागेवर 'फैसला'
शेतीविषयक योजना

पंढरपूरसह सांगोला, मंगळेवढा आणि माळशिरस या चार तालुक्‍यांसाठी पंढरपूर येथे उपविभागीय कृषी कार्यालय आहे. येथील कार्यालयातूनच शासनाच्या शेतीविषयक योजना राबवल्या जातात. येथील उपविभागीय कार्यालयासाठी शासनाने दोन कृषी अधिकाऱ्यांसह विविध 48 पदे मंजूर केली आहेत. सुरवातीच्या काळात ही सर्व पदे भरण्यात आली होती. परंतु अलीकडे अनेक अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे पदांची संख्या कमी झाली आहे. कमी झालेले रिक्त पदे अद्यापपर्यंत भरली गेली नाहीत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरच चारही तालुक्‍यांतील कामाचा भार पडला आहे. कर्मचारी कमी आणि काम जास्त, अशीच काहीशी स्थिती येथील कार्यालयात निर्माण झाली आहे. 

हेही वाचा : उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची मनधरणी!
कामकाजावर परिणाम

सध्या या विभागातून ठिबक सिंचन, शेततळी, फळबाग लागवड योजना, कृषी सल्ला, कृषी अवजारांचे वाटप, यांत्रिकीकरण, विविध पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा यासह शासनाचे विविध उपक्रम देखील राबवले जातात. दरम्यान, कार्यालयीन कामकाजातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने दैनंदिन कामकाजावर देखील याचा परिणाम झाला. परिणामी, शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. तर दुसरीकडे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उपविभागीय अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

हेही वाचा : कशामुळे हे गाव पडले ओस....
ही आहेत रिक्त पदे 

कृषी अधिकारी- दोन, कृषी पर्यवेक्षक- दोन, कृषी साहाय्यक- दोन, वरिष्ठ लिपिक- एक, लिपिक- एक, अनुरेखक- दोन, शिपाई- दोन, पहारेकरी- एक, रोपमळा मदतनीस- चार, ग्रेडवन मजूर- 10 अशी विविध प्रकारची 27 पदे रिक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT