Workers agitation in Srirampur 
पश्चिम महाराष्ट्र

व्हिडीओ)- श्रीरामपूरात कामगारांचा "एल्गार'

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशव्यापी संपात सहभागी होत कामगार संघटनांच्या संयुक्त कृतिसमितीतर्फे आज दुपारी शहरातून मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी सेविका, माथाडी कामगार, नगरपरिषदेचे कंत्राटी कामगार, केंद्रीय शासकीय कामगार, वैद्यकीय संघटना, औद्योगिक कामगार, शेतमजुरांसह विविध कामगार संघटनांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

शहरातील रेल्वेस्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बुधवारी (ता. 8) दुपारी पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात विविध मागण्यांचे फलक, बॅनर कामगारांनी हातात घेतले होते. कामगारांनी जोरजोरात घोषणा देत सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठविला. त्यानंतर संगमनेर-नेवासे रस्त्याने गांधी चौकात हा मोर्चा पोचला. तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला कामगारांनी अभिवादन केले. तेथून बेलापूर रस्ता, शिवाजी चौक, सय्यद बाबा चौक, कर्मवीर चौकामार्गे शांततामय वातावरणात येथील प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. 

ताधिकारी कार्यालयासमोर सभा

प्रशासकीय कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. बाळासाहेब सुरुडे, नागेश सावंत, अहमद जहागिरदार, राजेंद्र बावके, जीवन सुरुडे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. मदिना शेख, अशोक बागुल, तिलक डुंगरवाल, शरद संसारे, सागर शेवाळे यांनी भाषणे केली. त्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांना कामगार संघटना संयुक्त कृतिसमितीतर्फे निवेदन दिले. तहसीलदार पाटील यांनी निवेदन स्वीकारले. 

निवेदनात या मागण्यांचा समावेश

कामगार कायद्यातील विपरित बदल तात्काळ रद्द करावेत, सध्याच्या कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण, कंत्राटीकरणाचे धोरण मागे घ्यावे, तसेच कामगारांना किमान वेतन दरमहा 21 हजार रुपये करावे व विक्री वैद्यकीय कर्मचारी कायद्याचे संरक्षण करावे, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT