young man Celebrated birthday on the street 
पश्चिम महाराष्ट्र

video : तलवार नाचवत... भाई का बड्डे 

सकाळ वृत्तसेवा

नगर : रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मध्यभागी काही वाहने येऊन थांबतात. रस्त्याच्या मधोमध वाहनावर केक कापून वाढदिवस साजरा करण्याचे फॅड वाढत आहे. आता चक्‍क रस्त्यावर डीजे लावून "भाई का बड्डे' गाण्यावर हातात नंग्या तलवारी घेऊन नाचण्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील पोलिसांसमोर वेगळेच आव्हान उभे राहिले आहे. 

पाथर्डी तालुक्‍यातील टाकळी फाट्यावर नुकताच हा प्रकार समोर आला. काही मुलांनी मित्राच्या वाढदिवसासाठी रस्त्यातच डीजे लावला. रात्रीच्या शांततेला चिरत गेलेल्या डीजेच्या दणदणाटाने आसपासचे लोक व रस्त्यावरील प्रवासी चांगलेच वैतागले होते. तरुणांनी डीजेवर "भाई का बड्डे' गाणे लावण्याची "फमाईश' केली. त्याप्रमाणे गाणे लागले नि तरुणांनी रस्त्यावरच ठेका धरला. एकाने हातात नंगी तलवार धरीत नृत्य सुरू केले. एकाने त्याला खांद्यावर घेत जोरदार आरडाओरडा केला

या प्रकाराला वैतागून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस येत असल्याचे पाहून डीजेमालकासह तरुणांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. वाढदिवस साजरा करण्याच्या या अघोरी प्रकारामुळे पोलिस प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. तलवारी घेऊन नाच करणाऱ्या या तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शहरातील मोहीम थंडावली 
शहरातील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस करण्याचे पेव फुटले होते. मध्यंतरी पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडल्यानंतर हे प्रकार थांबले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चौकात चौकात रस्त्यावर वाढदिवस साजरे होऊ लागले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT