youngsters help to animal with the help of foundation in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

मुक्‍या जिवांना जगण्यासाठी बळ देणारी तरुणाई

शिवाजीराव चौगुले

शिराळा (सांगली) : कोरोनाच्या हाहाकारात प्रत्येकजण आपला जीव कसा वाचवता येईल यासाठी धडपडत सुरू आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धन करत आपल्या जीवाबरोबर मुक्‍या प्राणी, पशु-पक्षांचे, झाडांचे जीव वाचवण्यासाठी धडपडणारी शिराळा येथील तरुणाईने स्थापन केलेली प्लॅनेट अर्थ फाउंडेशन ही संस्था व त्या संस्थेतर्फे  सुरू असणारी वन्यजीव आपत्कालीन सेवा इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. 

या आपत्कालीन सेवेमुळे जखमी अवस्थेत असणाऱ्या चाळीस पेक्षा जास्त वन्य जीवांचे प्राण वाचवून त्यांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले. मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन सुरू झाला. रस्त्यावर असणारी माणसांची व वाहनांची वर्दळ थांबल्याने माणूस आणि वन्यप्राणी यांचे समोरा समोर येणे वाढले. कोरोनामुळे लोकांचे जीव वाचवण्यासाठी सर्व यंत्रणा आपल्या जीवाची बाजी लावत असताना आपला जीव वाचवण्या बरोबर मुक्‍या प्राण्यांचे, पक्षांचे, वनसंपदा वाचवण्यासाठी प्लॅनेट अर्थ फाउंडेशनची वन्यजीव आपत्कालीन सेवा कार्यरत होती. यामार्फत ४० पेक्षा जास्त वन्यजीव वाचणवले.

यामध्ये विविध कारणांनी जखमी झालेल्या नाग ८ घोणस-४ मण्यार- २ तसेच इतर बिन विषारी साप, माकड ४ भटकी कुत्री, पक्षी अशा चाळीस पेक्षा जास्त पशु पक्षांना  पशुसंवर्धन विभागामार्फत वन विभागाच्या देखरेखीखाली जीवदान मिळाले आहे. पक्षीनिरीक्षांचे काम सुरू आहे. शिराळा तालुक्‍यामत बिबट्याच्या सततच्या वावारामुळे लोकांच्यात भीती निर्माण झाली आहे. ही दूर करण्यासाठीमानव बिबट्या सहजीवन विषयक जनजागृती कार्यक्रम रवनविभाग व प्लॅनेट अर्थ च्या माध्यमातून सुरू केला आहे.

तालुक्‍यातील ९१ ग्रामपंचायत जनजागृती केली जाणार आहे. अडगळ व बांधकांस, अथवा रस्त्यासाठी अडथळा ठरणाऱ्या वड, पिंपळ आशा विविध ५० पेक्षा जास्त झाडांचे प्रत्यारोपण केले आहे. मियावकी जंगल निर्मिती तीन ठिकाणी केली असून त्या माध्यमातून साडेतीन हजार पेक्षा जास्त स्थानिक देशी झाडांचे रोपण आणि संवर्धन केले जात आहे. अशा प्रकारे पशु पक्षी, पर्यावरण संवर्धन करणाऱ्या या संस्थेचा कार्य इतरांना नक्कीच 
प्रेरणादायी आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT