पश्चिम महाराष्ट्र

बनावट जात दाखल्याद्वारे मिळविले पोलिस उपनिरीक्षक पद

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : बनावट जातीच्या दाखल्याआधारे पोलिस उपनिरीक्षक पद प्राप्त करणाऱ्या अभियांत्रिकी पदवीप्राप्त तरुणाचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले.

किरण राजेंद्र सोलगे (वय 25, रा. इचलकरंजी) असे त्या संशयिताचे नाव आहे.

लोकसेवा आयोगातर्फे 2016 मध्ये झालेल्या परीक्षेत त्याने एका मागासवर्ग जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे चौकशीत पुढे आले. अशी बनावट प्रमाणपत्रे देणारे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता असून, त्यानुसार तपास सुरू आहे. त्याला शाहूपुरी पोलिसांकडे वर्ग केल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. 

इचलकरंजीत किरण सोलगे राहतो. त्याने अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2016-17 मध्ये पोलिस उपनिरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाची परीक्षा झाली होती. या परीक्षांसाठी किरणने अर्ज भरले होते.

त्याची मूळ जात हिंदू-धनगर आहे. तरीही त्याने भरलेल्या दोन अर्जांपैकी एकात हिंदू-धनगर, तर दुसऱ्या अर्जात अन्य एक मागास जात असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर तो पोलिस उपनिरीक्षक पदाची लेखी व शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला शासनाकडून उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण घेण्याची ऑर्डर दिली जाणार होती.

दरम्यान, 2017 मध्ये कसबा बावडा येथे उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या शारीरिक चाचणीत किरणने धावण्याच्या स्पर्धेसाठी डमी उमेदवाराचा वापर केला होता, असा तक्रार अर्ज कोल्हापूर पोलिस दलाला प्राप्त झाला. याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला.

तपासात किरणची मूळ जात हिंदू-धनगर असल्याचे पुढे आले. तरीही त्याने उपनिरीक्षक पदासाठी दुसऱ्या मागास जातीचा आधार घेत त्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. जातीच्या सवलतीचा आधार घेऊन किरणने उपनिरीक्षक पद मिळविल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधिन केले. त्याच्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. सायंकाळी त्याला पोलिसांनी अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT