youth for jath
youth for jath 
पश्चिम महाराष्ट्र

'युथ फॉर जत'चे डिजिटल शाळा प्रकल्पाचे उदघाटन

सकाळवृत्तसेवा

जत (सांगली): 'युथ फॉर जत'चे डिजिटल शाळा प्रकल्पाचे उदघाटन नुकतेच झाले. या प्रकल्पामध्ये 'युथ फॉर जत' 30% रकमेची सहायता करते. उरलेले 70% रक्कम त्या शाळेचे शिक्षक वर्ग, संचालक मंडळ, गावकरी, ग्रामपंचायत, सधन शेतकरी, गावामधील बाहेर स्थायिक झालेले लोक आदी लोकांनी मिळून उभी करतात.

'डिजिटल भारत' चा नारा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. डिजिटल शिक्षण यावर महाराष्ट्र शासनाचा हि भर आहे. याला अनुसरून 'युथ फॉर जत' चा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे त्याचे नाव आहे “डिजिटल 425”. या प्रकल्प अंतर्गत संस्थेला जत तालुक्यामधील सर्व 425 जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा 2020 अखेर डिजिटल करण्याचा संस्थेचा मानस आहे. डिजिटल शिक्षण याचा अर्थ डिजिटल माध्यमे अर्थात स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, कॉम्पुटर अथवा लॅपटॉप या द्वारे शिक्षण देणे असा आहे. डिजिटल शिक्षणाचे ग्रामीण शिक्षणा मध्ये बरेच फायदे आहेत. यामुळे शिक्षकांचे बहुतांश काम सोयीस्कर होण्याबरोबरच शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावतो.

या प्रकल्पाचे पहिले पाऊल संस्थेने जत तालुक्या मधील कुलालवाडी, अचकनहळ्ळी, बागेवाडी या जिल्हा परिषद शाळा तसेच येळवी हायस्कूल, येळवी आश्रम शाळा आणि श्री श्री विद्या मंदिर, बनाळी अशा एकूण सहा शाळांना सॉफ्टवेअर देऊन उचलले आहे. याचबरोबर अजून बऱ्याच जिल्हा परिषद शाळा या प्रकल्पाद्वारे आपल्या शाळा डिजिटल करण्याच्या मार्गावर आहेत. अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.youth4jath.org या संकेतळावर आहे.

संस्थेबद्दल थोडक्यात...
'युथ फॉर जत' हि एक सामाजिक संस्था आहे. स्थापना जुलै 2016 मध्ये झाली आहे. हि एक नोंदणीकृत संस्था असून नोंदणी सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 अंतर्गत झाली आहे. या संस्थेशी जत मधील उच्च शिक्षित तरुण संलग्न आहेत. जे देश-विदेश मध्ये उच्च पदावर काम करत आहेत. हि संस्था शाळा, शिक्षक, शासकीय अधिकारी यांच्या बरोबर विद्यार्थ्यांच्या सशक्तीकरणा करिता काम करते. यामुळे पुढे जाऊन ते त्यांच्या स्वतःच्या जीवना मध्ये आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतील. शिक्षण हे समाज बदलण्यासाठी सर्वांत प्रभावी शस्त्र आहे, असा संस्थेचा दृढ विश्वास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT