Youth Developed Road Of Virmade To Kalambe Satara  
पश्चिम महाराष्ट्र

युवकांच्या प्रयत्नातून विरमाडे-कळंबे रस्त्याची दुरुस्ती 

सकाळ वृत्तसेवा

सायगाव (जि. सातारा) : आज गावोगावी अनेक रस्त्यांची शासनाच्या निधीअभावी परवड झाली आहे. मात्र, या पार्श्‍वभमीवर कळंबे (ता. वाई) येथील युवकांनी शासनाच्या निधीची वाट न पाहता श्रमदानातून व वर्गणी काढून रस्ता तयार करून समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे.

हेही वाचा - पाटण तालुक्यात दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार 

विरमाडे ते कळंबे हा रस्ता गेली कित्येक वर्षे खड्ड्यांमुळे धोकादायक बनला होता. त्यातील काही रस्ता शासन निधीतून तयार झाला होता. मात्र, निकृष्ट कामामुळे त्याची लगेच दुर्दशा झाल्याने ग्रामस्थांना मोठमोठ्या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत होता. येथून पुढे सर्जापूर, कुडाळकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात सुरू असते. अखेर गावातील सर्व युवकांनी एकत्र येत शासकीय निधीची वाट न पाहता जेवढी जमेल तेवढी रक्कम गोळा करून प्रत्यक्षात रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेतले.

यासाठी सिमेंट, खडी, वाळू आदी साहित्य गोळा करून स्वतःच कामाला सुरवात केली. सर्वप्रथम कळंबे व सर्जापूर गावाला जोडणाऱ्या पुलावर पडलेला मोठमोठे खड्डे भरून घेत रस्ता चकाचक केला. या गावचे सैन्यदलात असणारे जवान विजय वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन या तरुण वर्गाला लाभले.

हेही वाचा - शिवेंद्रसिंहराजेंचा टोल नाका बंदचा निर्धार

वाघ यांनी गावातील युवकांचे प्रबोधन करून राजकारण, गट-तट बाजूला ठेवून गावासाठी काम करण्यासाठी प्रवृत्त केले व अनेक कामे हाती घेऊन पूर्ण केली. युवक वर्ग दिवसभर आपापले उद्योग करून रोज रात्रीच्या वेळी हे एकत्र येत श्रमदान करत ही कामे पूर्ण करत आहेत. त्यात गावातील ग्रामस्थ, महिलादेखील आपापल्या परिने शक्‍य होईल तेवढी मदत करत आहेत, तर त्यांच्या या कामाचे परिसरातून कौतुक होत आहे. 


आमच्या गावचे कारगिल युद्धात हुतात्मा झालेले जवान शशिकांत शिवथरे यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आम्ही कामाला सुरवात केली आहे. आम्ही सरकारी निधीची वाट न पाहता ग्रामस्थ, महिला, युवकाने लोकवर्गणीतून विकासकामे करण्याचा निर्धार केला आहे. 

कॅप्टन विजय वाघ, सामाजिक कार्यकर्ते. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT