Zare Parekarwadi Accident Kolahapur Marathi News
Zare Parekarwadi Accident Kolahapur Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

पारेकरवाडीत घडली एवढी मोठी घटना मात्र लोकप्रतिनिधी फिरकलेच नाहीत...

सकाळ वृत्तसेवा

झरे (सांगली) : नातेवाईकाच्या दहन विधीला ला जाताना झालेल्या अपघातात ठार झालेल्या पारेकरवाडी येथील पाच जणांवर शोकाकुल वातावरणात सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी नातलगांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.

 रविवारी रात्री 10 च्या सुमारास ड्राइवर चे स्टेरिंग लॉक झाल्याने गाडी विहिरी पडली आणि पारेकरवाडी येथील 5 जण जागेवरच मृत्युमुखी पडल्याने झरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातामध्ये गाडी पूर्ण पाण्यात गेल्याने पाण्यात गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला होता.

दैव बलवत्तर म्हणून...

यामध्ये मच्छिंद्र पाटील(वय ६०),कुंडलीक बरकडे (वय६0),गुंडा डोंबाळे( वय 35),संगीता पाटील (वय 40),शोभा पाटील (वय 38) हे सर्व रा.पारेकरवाडी या पाच जणांचा मृत्यू झाला तर हरिबा वाघमोरे (रा.बेरगळवाडी) हे जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून हरिबा वाघमोरे हे गाडीमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. रात्रीच्या अंधारात भेदरलेल्या अवस्थेतच त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना अपघाताची माहिती दिली.


 आत्तापर्यंत पारेकरवाडीl 8 नागरिकांचा मृत्यू..
आज दुपारी २.१५ ला दहन विधी करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजप युवा नेते गोपीचंद पडळकर, माजी उपसभापती तानाजी यामगार, सरपांचं चंद्रकांत पावणे, अधिक माने,साहेबराव चवरे,यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.या दोन महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात आत्तापर्यंत पारेकरवाडीच्या 8 नागरिकांचा मृत्यू झाल्याने गावावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सोमवारी दुपारी पारेकरवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 आपल्या मतदारसंघात हृदय पिटाळून टाकणारी घटना घडली असताना लोकप्रतिनिधी फिरकलेच नाहीत अशी अंत्यसंस्कार च्या ठिकाणी चर्चा सुरू होती. 

लोकप्रतिनिधीं घटनास्थळी फिरकले नाहीत
लोकप्रतिनिधी खासदार संजय पाटील, व आमदार अनिल बाबर हे लोकप्रतिनिधीं घटनास्थळी फिरकले नाहीत. निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी मतदार संघामध्ये फिरत असतात परंतु मतदार संघामध्ये दुःखद घटना घडली असताना तिकडे फिरकत सुद्धा नाहीत. सुखामध्ये सहभागी होतात परंतु दुःखामध्ये सहभागी होत नाहीत अशी चर्चा अंत्यविधीच्या वेळी लोकांच्यातून सुरू होती. मयत व्यक्ती या गरीब कुटुंबातील असून त्यांना शासनाकडून आपत्कालीन विभागातून मदत मिळायला हवी  अशी जनतेतून चर्चा आहे पारेकरवाडी ही तिसरी घटना असून यामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

शासनाकडून मदत मिळायला हवी
 लोकसभा व विधानसभा मतदारसंघांमध्ये हृदय पिटाळून सोडणारी घटना घडली परंतु लोकप्रतिनिधींनी भेट देऊन सांत्वन करण्याची गरज होती परंतु लोकप्रतिनिधी फिरकलेच नाहीत अपघातातील सर्वच मयत व्यक्ती या गरीब कुटुंबातील असून त्यांना शासनाकडून मदत मिळायला हवी आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT