Stepmother brother filed a case for Deadly attack with an ax 
पिंपरी-चिंचवड

आईची कबुतरावर मोहमाया; लेकाच्या साथीनं सावत्र मुलावर केला प्राणघातक हल्ला

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कबुतरे उडविल्याच्या कारणावरून कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सावत्र आई व सावत्र भावासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना चिखली येथे घडली. 

सागर दयानंद कांबळे (रा. बोल्हाईमळा कॉलनी नंबर 9, जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादीचा सावत्र भाऊ सिद्धेश्‍वर कांबळे, फिर्यादीची सावत्र आई माया कांबळे (दोघेही रा. बोल्हाईमळा कॉलनी नंबर 9, जाधववाडी, चिखली) यांच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

राज्यपालांनी आता आमचा अंत पाहू नये : अजित पवार 

गुरूवारी (ता.4) रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी हे जेवण करून त्यांच्या घरासमोर उभे होते. त्यावेळी फिर्यादी यांचा भाऊ श्रीधर याने कबुतरे उडविल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तर श्रीधर यास "घराबाहेर ये तुला खूप मस्ती आली आहे', असे म्हणत त्यास शिवीगाळ केली.

दरम्यान, माया कांबळे हिने फिर्यादीला पकडले तर सिद्धेश्‍वर याने कुऱ्हाडीने फिर्यादीच्या डोक्‍यात, पाठीवर, हातावर वार केले. तसेच माया कांबळे हिच्यासह इतर आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT