Bhosari_Pune Metro Esakal
पिंपरी-चिंचवड

Bhosari Metro Station: 'भोसरी' स्टेशनचं नाव बदला! महामेट्रोची केंद्रीय मंत्रालयाकडं मागणी, जाणून घ्या कारण...

पुण्यात मेट्रो रेल्वेला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला असून प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पुण्यात मेट्रो रेल्वेला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला असून प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण पिंपरी-चिंचवड मुख्यालय ते शिवाजीनगर कोर्ट या मार्गावरील भोसरी स्टेशनवरुन प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळं या मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (महामेट्रो) केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडं केली आहे. (Bhosari Metro Station name Change demand by Maha metro to Union Ministry)

मोदींच्या हस्ते उद्घाटन

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधून जाणारे मेट्रो मार्ग गेल्या एक ते दीड वर्षात दोन टप्प्यात सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही मार्गांची उद्घाटनं झाली. यांपैकी येत्या मार्च महिन्यात पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावरील मार्गाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. पण आता प्रवाशी संघटनेनं या मार्गावरील भोसरी स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी केली आहे.

नाव बदलण्याची मागणी प्रवाशी का करताहेत?

भोसरी स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. भोसरी ऐवजी या स्टेशनचं नाव नाशिक फाटा असं करण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. कारण या स्टेशनला भोसरी नाव दिल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)

हे स्टेशन ज्या ठिकाणी स्थित आहे त्या भागाला नाशिक फाटा नावानं ओळखलं जातं तर भोसरी या ठिकाणाहून पाच किमी दूर आहे. सध्याचं स्टेशन आणि नाशिक फाटा ही ठिकाणी पुणे-मुंबई हायवेवर येतात. तर भोसरी हे ठिकाण पुणे-नाशिक हायवेवर येतं. (Marathi Tajya Batmya)

महामेट्रोची मागणी

महामेट्रोनं सांगितलं की, कंपनीनं केंद्रीय मंत्रालयाकडं भोसरी हे नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर इतरही काही स्टेशनची नाव बदलण्याची मागणी केली आहे. ज्यामध्ये बुधवार पेठ या स्टेशनचाही समावेश आहे. प्रवाशांनी हे नाव बदलण्याची मागणी संघटनेकडं केली आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डिकर यांनी दिली.

दरम्यान, भोसरी स्टेशन ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथले खासदार श्रीरंग बारणे हे आहेत. महामेट्रोनं अशा प्रकारची विनंती सरकारकडं केल्याची आपल्याला माहिती नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. पण महामेट्रोनं याबाबतचा प्रस्ताव आपल्याकडं द्यावा आपण ते सरकारपर्यंत पोहोचवू, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election 2025 : अखेर मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा....

BMC Election: सत्ता, संघर्ष आणि संधी... बीएमसीच्या गेल्या ५ निवडणुकांचे निकाल काय होते? जाणून घ्या मुंबई महापालिकेचा राजकीय प्रवास...

Latest Marathi News Live Update : महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार

IPL 2026 Auction : उद्या लिलाव अन् पठ्ठ्याने आज ठोकले खणखणीत शतक... कुटल्या १५ चेंडूंत ७२ धावा; RCB च्या माजी खेळाडूची धमाल

हॉलिवूड हादरलं ! हॅरी मेट सॅली फेम प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT