BJP Hirabai Ghule unopposed elected as Deputy Mayor PCMC
BJP Hirabai Ghule unopposed elected as Deputy Mayor PCMC 
पिंपरी-चिंचवड

उपमहापौरपदी भाजपच्या हिराबाई घुले बिनविरोध

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी भाजपच्या हिराबाई घुले यांची मंगळवारी (ता. २३) बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भालेकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली. महापालिका भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक झाली. पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल पीठासन अधिकारी होत्या. दरम्यान, महापालिकेतील संख्या बळानुसार घुले यांची निवड निश्‍चित मानली जात होती. त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, केशव घोळवे यांनी अवघ्या चार महिन्यांत राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. त्यासाठी शुक्रवारी (ता. १९) उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सत्ताधारी भाजपकडून घुले यांनी तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भालेकर यांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यांची छाननी करून दोघांचे अर्ज वैध ठरले. पीठासन अधिकारी अग्रवाल यांनी माघारीसाठी पंधरा मिनिटांची वेळ दिली होती. निर्धारित वेळेत भालेकर यांनी माघार घेतली. त्यामुळे अग्रवाल यांनी घुले यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

दिघी- बोपखेल प्रभाग क्रमांक चारचे प्रतिनिधित्व घुले करीत आहेत. गेल्या चार वर्षात त्यांना एकही पद मिळाले नव्हते. यावेळी भाजपने त्यांना उपमहापौरपदी संधी दिली आहे. नवनिर्वाचित उपमहापौर घुले यांचे महापौर उषा ढोरे, महापालिका आयुक्त राजेश पाटील, पीठासीन प्राधिकारी रुबल अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. नगरसचिव उल्हास जगताप यांनी सभेचे प्रशासकीय कामकाज पाहिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निवडणुकीची जय्यत तयारी
उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरले होते. मात्र, सभागृहात १२८ पैकी १०१ नगरसेवक उपस्थित होते. यात सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व अपक्ष नगरसेवकांचा समावेश होता. भाजप नगरसेवक व नगरसेविका भेटे घालून उपस्थित होत्या. निवडणूक ऑनलाइन होणार असल्याने सत्ताधारी भाजपची मते फुटू शकतील, असा अंदाज राष्ट्रवादीचा होता. मात्र, सभागृहात सदस्यसंख्या पुरेशी होती. त्यामुळे उमेदवारी माघारीच्या पंधरा मिनिटांच्या कालावधीतील शेवटच्या तीन मिनिटे अगोदर राष्ट्रवादीचे उमेदवार भालेकर यांनी माघार घेतली. विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी माघारीचा अर्ज पीठासन अधिकारी रूबल अग्रवाल यांच्याकडे दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT