Corona-Virus 
पिंपरी-चिंचवड

चिंचवडच्या काकडे पार्कमध्ये कोरोना आला रे आला; काय आहे वास्तव वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - चिंचवड गाव म्हणजे महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. मोरया गोसावी यांनी साधारणतः चारशे वर्षांपूर्वी स्थापित केलेली स्वयंभू गणरायाची मूर्ती आणि मंदिर येथे आहे. तोच मंगलमूर्ती वाडा. त्यापासून जवळच पवना नदीकाठी महासाधू मोरया गोसावी यांचे समाधी मंदिर. आणि या दोन्ही तिर्थस्थळांच्या सानिध्यात काही वर्षांपूर्वी वसलेली वसाहत म्हणजे काकडे पार्क. चिंचवडमधील नावाजलेला परिसर. कलासक्त व सदैव जागृत नागरिक येथे राहतात, अशी परिसराची ख्याती. काकडे पार्क म्हटलं की कलेचे उपासक येथे राहतात, असेच जणू समीकरण बनले आहे. पण, गेल्या दोन दिवसांपासून हा परिसर वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. आणि ते कारण म्हणजे जागतिक महामारी कोरोना. होय, कोरोना.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिंचवडच्या काकडे पार्कमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे, म्हणजे येथे कोरोना संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे, अशी महापालिका प्रशासनाकडे नोंद आहे. आणि ही नोंद राज्य व केंद्र सरकारच्या दप्तरीसुद्धा पोचली आहे. पण, येथील रहिवासी म्हणतात, 'कोरोना आमच्या पर्यंत पोचलाच नाही. आमच्याकडे कोरोनाचा एकही रुग्ण नाही. जो रुग्ण आढळला आहे आणि तो काकडे पार्क येथील रहिवासी सांगतो आहे, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही.' पण, संबंधित रुग्णाने रुग्णालयात दाखल झाला तेव्हा आपल्या निवासाचा पत्ता काकडे पार्क सांगितला आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधित व्यक्तींची तपासणी करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी संबंधित पत्त्यावर पोचले. तेव्हा कळले की, सदर रुग्ण पूर्वी येथे राहत होता. आता तो मुंबईत अंधेरी परिसरात राहायला आहे. वस्तुस्थिती कळली आणि चिंचवडकरांसह महापालिका प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

असा आला रुग्ण
चिंचवड काकडे पार्क असा निवासाचा पत्ता सांगणारा रुग्ण एक साठीच्या पुढील महिला आहे. काही महिने ती काकडे पार्क येथे मुलाकडे राहायला होती. मात्र, वर्षीपूर्वी मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या मोठ्या मुलाकडे राहायला गेली. चार दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने त्यांनी भाडेतत्त्वावर टॅक्सी केली आणि चिंचवड गाठले. मात्र काकडे पार्क येथे मुलाकडे न येता थेट मल्टिस्पेशालिटी खाजगी हाॅस्पिटल गाठले. 

मुंबईहून आलेली महिला दाखल असलेल्या रुग्णालयाला कोरोना रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांनी नमुने घेऊन तपासण्यासाठी पाठवले. तशी नोंद महापालिका वैद्यकीय विभागाकडे केली. दुसऱ्या दिवशी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हाॅयराॅलाॅजी कडून महिलेचा रिपोर्ट आला पाॅझिटीव्ह. प्रशासनाने पुढील कारवाई सुरू केली. महिलेने दिलेल्या पत्त्यावर सर्वेलीयन पथक पोचले. तो पत्ता होता काकडे पार्क, चिंचवड गाव.

काकडे पार्कमध्ये राहणारी व्यक्ती होती, कोरोना संसर्ग झालेल्या महिला रुग्णाचा धाकटा मुलगा. परंतु, आई चिंचवडला आली आहे आणि ती रुग्णालयात दाखल झाली आहे, हे त्याला माहितीच नव्हते. सर्वेलीयन पथकाकडून कळले. मात्र, तो पर्यंत काकडे पार्क मध्ये कोरोना रुग्ण आढळल्याची कानोकान खबर परिसरात पसरली होती. नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. वस्तुस्थिती कळल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण, 'लांडगा आला रे आला'प्रमाणे 'काकडे पार्कमध्ये कोरोना आला रे आला'ची कथा चांगलीच रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT