Clocks with artistic woodwork are becoming a consumer attraction 
पिंपरी-चिंचवड

कलात्मक काष्ठशिल्प असलेली घड्याळे ठरत आहेत ग्राहकांचे आकर्षण 

सकाळवृत्तसेवा

मोशी : लाकडी सुंदर काष्ठशिल्पामध्ये मढवलेली अँटीक पिस सारखी दिसणारी भिंतीवरील घड्याळे सध्या मोशी-भोसरी दरम्यानच्या पुणे-नाशिक महामार्गालगत उत्तर प्रदेशच्या कलावंतांनी विक्रीसाठी ठेवली आहेत. कलेचे शौकीन असणारे नागरीक ही घड्याळे घेण्यासाठी आवर्जून थांबत आहेत. 

शिल्पकलेचा काष्ठ हेही एक महत्त्वाचे माध्यम आहे. हस्तव्यवसाय व इतर उपयुक्त कला इत्यादींत जसा लाकूडकामाचा समावेश होतो, त्याचप्रमाणे उच्च प्रकारची शिल्पकला म्हणूनही काष्ठशिल्प गणली जाते. 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काष्ठशिल्पे अनेक जातींच्या लाकडांमध्ये करतात. काष्ठशिल्पांसाठी भारतात सागवान, शिसम, अक्रोड आदी जातींचे लाकूड वापरात आहे. सध्या ही घड्याळाची शिल्पे तयार करण्यासाठी आसाम राज्यातील आक्रोड या जातीच्या लाकडाचा वापर करत आहोत. पूर्वनियोजित कल्पनेनुसार लाकडाचे विविध भाग तयार करुन त्यामधून हरीण, गरुड, फुलांचे अलंकारिक आकार आदी आकार तयार करुन त्यात विविध कंपन्यांची घड्याळे बसविली जातात. त्यांत मूळ लाकडाच्या पाेताचाही विचार केला जातो. 

ही घड्याळे एकाच प्रकारच्या लाकडाचे लहान मोठे आकार एकमेकांमध्ये गुंतवून केली जातात. यामध्ये सजावटीसाठी काचेचे रंगीत खडे, कवड्या, शिंपले आदी वस्तू लाकडामध्ये कोरून बसविण्यात येतात. या काष्ठशिल्पांचा पृष्ठभाग मेणाने गुळगुळीत करुन त्यावर चकाकीसाठी पॉलिशही केले जाते. काष्ठशिल्पांचा काही पृष्ठभाग गुळगुळीत, खडबडीत व कोरीवही ठेवला जात असल्याचे उत्तर प्रदेश सहानपूर येथून विक्रीसाठी आणलेल्या राजू व शहजाद या कलावंतांनी सांगितले.

इंदापूरजवळ ट्रक-कारचा भीषण अपघात; पुण्यातील दांपत्याचा जागीच मृत्यू​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

SCROLL FOR NEXT