maval.jpg 
पिंपरी-चिंचवड

पवनानगर : कडधेतील ते आठ रूग्ण अन्...

सकाळवृत्तसेवा

पवनानगर  : कडधेतील त्या आठ जणांचा कोरोना तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कडधे येथील ४५ वर्षीय नागरिकाला  कोरानाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना तपासणीसाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आज त्या सर्वाचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती येळसे प्राथमिक आरोग्य केंंद्राचे अरोग्य अधिकारी डॉ.वामन गेंगजे यांनी दिली.

सदर व्यक्तींना चौदा दिवस होम क्वारंटाईन केले जाणार आहे. कडधे ४५ वर्षीय नागरिक त्रास होऊ लागल्याने चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्याची तपासणी केली असता, त्याला कोरानाची लक्षणे आढळून आले. या व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.

तसेच या व्यक्तीच्या कुटुंबातील आठ जणांना जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने परिसरातील नागरिकांनी दिलासा मिळाला आहे. 

दरम्यान, कडधे प्रतिबंधित तर परिसरातील पाच किलोमीटर क्षेत्रात बफर झोन जाहीर केला आहे. या आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह असले तरी त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मोठा निकाल! गरोदरपणात सुनेला नोकरी सोडण्याचा सल्ला देणे ही क्रूरता नाही; मुंबई न्यायालयाचा निर्णय

Mumbai News : गुटखा-हुक्का प्रकरणात विभागाची वादग्रस्त भूमिका; जप्त माल सोडण्यास परवानगी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update: मुंबईमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल...

Railway Police : लोहमार्ग पोलिस दलात राजश्री नाणेकर यांची निवड

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी ओटीटी’चा खास नजराणा! ७५ हून अधिक गाजलेली नाटकं घरबसल्या पाहा

SCROLL FOR NEXT