Corporators demand to look after stray dogs in Old Sangavi 
पिंपरी-चिंचवड

नगरसेवक म्हणतायेत, स्मार्टसिटी करताय, आधी मोकाट कुत्री आवरा!

रमेश मोरे

जुनी सांगवी(पुणे) : एकीकडे नागरिकांवर कोरोना महामारीचे संकट तर, त्यातच भरीस भर म्हणून जुनी सांगवी परिसरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत झाल्याने परिसरात कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. नागरिकांच्या रोज तक्रारी येत आहेत. सायंकाळी व सकाळी फेरफटका मारण्यासाठी जाणारे नागरिक, बाजारपेठा या सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी ही मोकाट कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याच्या घटना परिसरात वारंवार घडत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गर्दीची सार्वजनिक ठिकाणे प्रमुख रस्ते गल्ल्ली बोळांमधून कुत्र्यांची टोळकीची टोळकी फिरत असल्याने नागरिकांना यांच्यापासून बचाव करावे लागत आहे. अनेकदा ही कुत्री दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मागे धावतात, यात अनेकदा दुचाकीस्वार घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत नागरिकांच्या रोजच तक्रारी येत असून नगरसेवक वैतागले आहेत. स्मार्ट सिटी होत असताना आधी कुत्री आवरा, असे नगरसेवकाने नागरीकांच्यावतीने गाऱ्हाणे मांडले आहे.

राज्यात दहावीचा निकाल लागला ९५ टक्के : यंदाही मुलींनीच मारली बाजी
वाढत्या मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त करणे गरजेचे आहे. प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. गल्ली बोळात मोकाट फिरणाऱया कुत्र्यांमुळे जीव मुठीत घेवून नागरिकांना रहदारी करावी लागत आहे. दिवसा रात्री कुत्र्यांच्या टोळक्याचा वावर परिसरात वाढला आहे. कुत्री अंगावर धावून येतात. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना याची ईजा झाली आहे.

पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरण लसीकरण केले जाते, परंतू त्याची संख्या नियंत्रणात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे. निर्बिजीकरण शस्रक्रियेवेळी त्यांच्यापासून धोका कमी करण्यासाठी हा उपाय केला जातो, अशी कुत्री ओळखण्यासाठी त्यांचा कान कापून खूण करण्यात येते. त्रासदायक कुत्र्यांबाबत तक्रार केल्यास पालिकेच्या संबंधित विभागाकडून अशी कुत्री पकडली जात नाहीत तर, लसीकरण केलेली कुत्री चावल्यास त्यापासून माणसाला धोका होणार नाही याची काय हमी आहे काय? अशा प्रकारे लसिकरण केलेल्या कुत्र्यांवर लसीचा प्रभाव किती महिने राहतो किती वर्ष राहातो याबाबत संबंधित पशुवैद्यकीय विभागाने माहिती द्यावी. रेबीज लस दिलेल्या कुत्र्यांची नोंद पशुवैद्यकिय विभाग कशाप्रकारे ठेवतो त्यांची संख्या किती? याबाबतही सविस्तर माहिती मिळावी, अशी जुनी सांगवी येथील प्रभाग क्र.३२ मधील नगरसेवक हर्षल ढोरे यांनी पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे.

धक्कादायक! पुण्यात आजारपणाला कंटाळून पत्नीची हत्या; पतीने घेतला गळफास

स्मार्ट सिटी होत असताना आधी कुत्री आवरा, असा सुर नगरसेवकांनीच आवळला असल्याने प्रशासन आता नगरसेवकांचे म्हणणे तरी कितपत ऐकतेय हे पहावे लागणार आहे. याबाबत पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क होवू शकला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT