Anil Shete Sakal
पिंपरी-चिंचवड

टेम्पो-दुचाकीच्या अपघातात बैलगाडा शौकीनाचा मृत्यू

बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या शेटेवाडी येथील तीस वर्षीय तरुणाचा दुचाकी घसरून टेम्पोच्या चाकाखाली सापडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या शेटेवाडी येथील तीस वर्षीय तरुणाचा दुचाकी घसरून टेम्पोच्या चाकाखाली सापडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

तळेगाव स्टेशन - मावळातील नाणोली तर्फे चाकण येथील घाटावर आयोजित बैलगाडा शर्यत (Bullockcart Competition) पाहण्यासाठी आलेल्या शेटेवाडी येथील तीस वर्षीय तरुणाचा (Youth) दुचाकी घसरून टेम्पोच्या चाकाखाली सापडल्याने (Accient) दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. हा अपघात इंदोरी ते नाणोली रस्त्यावर शनिवारी (ता.१२)  दुपारी एकच्या सुमारास झाला. अनिल प्रकाश शेटे (३०, शेटेवाडी, मावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. नाणोली येथे आयोजित बैलगाडा शर्यत पाहून अनिल हा आपल्या मित्राला भेटावयास चालला असताना रस्त्यावरील खडीवरुन त्याची दुचाकी घसरून तो टेम्पोच्या चाकाखाली सापडला.

जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या मयत अनिलच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन छोटी मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी टेम्पोचालक पंढरीनाथ प्रकाश फडके (२५, कान्हेफाटा, मावळ) याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी मोटार वाहन अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. टेम्पो चालक फडके हा चाकण एमआयडीसीतून तळेगाव एमआयडीसीत माल घेऊन जात असताना, दुचाकी घसरून मयत शेटे हा टेम्पोच्या चाकाखाली आला. पुढील तपास पोलीस हवालदार सचिन काचोळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुंबईला कचरामुक्त शहर करणार, तिसऱ्या मुंबईत इनोव्हेशन सिटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दावोसमध्ये घोषणा

Pune News : पुणे महापौरपदाची निवडणूक २ फेब्रुवारीला?

तरुणांनो तयारीला लागा..! ‘सीसीटीव्ही’च्या नजरेत ११ फेब्रुवारीपासून पोलिस भरतीची मैदानी चाचणी; एकाच पदासाठी एकाच अर्ज ग्राह्य धरला जाणार

ढिंग टांग : नवीन है वह…!

Global Impact Forum 2026 : ग्लोबल इम्पॅक्ट फोरममध्ये तज्ज्ञांचे मत; टेपा करारामुळे आर्थिक संबंध नव्या उंचीवर

SCROLL FOR NEXT