PCMC 
पिंपरी-चिंचवड

विकासकामांची ‘लगीनघाई’; विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांची लगबग

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘काही नाही. मीटिंग शांततेत झाली. सर्व विषयांवर साधक-बाधक चर्चा झाली.’ ‘निवडणूक अवघी वर्षावर आलीय, हे वर्ष तर कोरोनामुळे असंच वाया गेलंय. आता कामं करावी लागतील.’ ‘अरे, तुमच्या भागातली काही नवीन कामं असतील सुचवा. येत्या मीटिंगमध्ये मंजूर करून टाकू.’ ‘आम्हाला भुयारी मार्ग करायचाय. आठवडाभरात त्याचं सर्वेक्षण होईल व पुढच्या डिसेंबरपर्यंत तो पूर्ण होईल.’ ही वक्तव्यं आहेत, विद्यमान नगरसेवकांची. महापालिका निवडणूक अवघी वर्षभरावर आल्याने आपापल्या प्रभागातील प्रलंबित, अपूर्ण व नवीन कामे करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विद्यमान व माजी नगरसेवकांसह अन्य इच्छुकांच्यासुद्धा महापालिकेत चकरा वाढल्या आहेत.

सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झालाय. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून होऊ न शकलेल्या महापालिका विषय समित्यांच्या बैठकी प्रत्यक्ष उपस्थित राहून सुरू झाल्या आहेत. नगरसेवकांसह प्रशासनाने सुचविलेल्या विषयांसह ऐनवेळचे विषय उपसूचनांसह मंजूर करून घेतले जात आहेत. कारण, महापालिका निवडणूक अवघी वर्षभरावर आली आहे. त्यामुळे बहुतांश नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील रस्ते, सांडपाणी वाहिन्या दुरुस्तीची कामे काढली आहेत. त्यानिमित्ताने अर्धवट व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विषय समित्याही गजबजल्या
महापालिका विषय समित्यांच्या अर्थात विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण,  क्रीडा- साहित्य- सांस्कृतिक आणि शिक्षण या समित्यांच्या सभा होऊ शकल्या नाहीत. त्यांच्याही सभा आता होऊ लागल्या आहेत. शहर सुधारणा (ता. १५), शिक्षण (ता. १७) आणि महिला व बालकल्याण (ता. २४) यांच्या सभा झाल्या आहेत. क्रीडा-साहित्य व सांस्कृतिक समिती सभा सोमवारी (ता. २८) व विधी समिती सभा शुक्रवारी (ता. १) होणार आहे.

स्थायी सभा शांततेत
स्थायी समितीत सर्वच विषयांवर चर्चा होते. एका पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यासह ग्लास फोडणे, अजेंडा फाडणे, फायली भिरकावणे, प्रसंगी सभा तहकूब करणे असे प्रकार वारंवार घडले आहेत. गेल्या दोन सभांपासून मात्र सर्वकाही अलबेल सुरू आहे. नेहमी वादग्रस्त ठरणारी स्थायी समितीची साप्ताहिक सभा गोडी-गुलाबी व शांततेत होऊ लागली आहे. बुधवारची (ता. २३) सभा अवघ्या दीड तासांत आटोपली. नियोजित ५३ विषयांसह ६२ विषयांवर चर्चा झाली. ऐनवेळचे विषय व उपसूचना मंजूर झाल्या. यावरून ‘निवडणूक आली रे!’चा संदेश मिळत आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT