pcmc sakal
पिंपरी-चिंचवड

हौसिंग सोसायटीधारक-प्राणिमित्रांमध्ये वाद जुंपला

भटक्या श्वानांच्या मृत्यूप्रकरणी अध्यक्षांसह रहिवाशांवर गुन्हा दाखल; नाहक त्रासाचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : वाकड कस्पटे वस्तीतील निसर्ग सिटी टू हौसिंग सोसायटीमध्ये दोन ऑगस्टला दुपारच्या वेळेत दोन भटकी कुत्री सोसायटीत शिरले. त्यामुळे ‘कुत्र्यांपासून सावध राहा’, असा संदेश सोसायटीच्या ग्रुपवर व्हायरल झाला. कुत्री काही वेळाने सोसायटीच्या टेरेसवर गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन ऑगस्टला त्यांचा टेरेसवरून पडून मृत्यू झाला. यावरून प्राणिमित्र व सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलेच वाद जुंपले आहेत. प्राणिमित्रांनी सोसायटीवर गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला नाहक त्रास देत, बदनामही केले जात आहे. योग्य तो न्याय मिळावा, अशी भावना सोसायटीधारकांची आहे. (PCMC News)

सोसायटीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कुत्र्यांनी नेमका सोसायटीत कोठून प्रवेश केला हे माहीत नाही. सोसायटीच्या ‘बी’ विंगमध्ये शिरल्यानंतर त्यांनी वायर चावल्या आणि कचरापेट्या पाडल्या. काही वेळाने ती जिन्यात बसली. त्यानंतर टेरेसवर गेली. दोन दिवस सोसायटीत दुधवाला व कचरावेचक आले नाहीत. कारण कुत्री भुंकत व गुरगुरत होती.

सुरक्षारक्षकाने त्यांना बाहेर हुसकावण्याचा प्रयत्न केला. महापालिकेत तक्रार केली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे सहाव्या मजल्यावरून पडून कुत्री मरण पावली. या घटनेचे प्राणिमित्र भांडवल करत आहेत. सोसायटीतील रहिवासी घाबरल्याने कुत्र्यांच्या जवळदेखील गेले नाहीत. प्राणिमित्रांना घटना समजल्यानंतर त्यांनी अनधिकृतपणे सोसायटीत प्रवेश केला. रहिवाशांना अरे-तुरेची भाषा वापरली. सोसायटी प्रवेश रजिस्टरवर नोंदही केली नाही. पूर्ववैमनस्यातून रहिवाशांना धमक्या दिल्या. कुत्र्यांना कोणतीही दुखापत न पोहचवताही अध्यक्ष, सचिव व सदस्यांना या प्रकरणात जबाबदार धरले जात आहे. या प्राणिमित्रांनी पोलिसांना बोलावून खोटा गुन्हा दाखल केला आहे.’

तक्रारदार तेजप्रताप पासवान यांना सोसायटीत कराटे क्लास घेण्यापासून काही दिवसांपूर्वी थांबवले होते. याचा राग मनात ठेवून त्यांनी हे कृत्य केले आहे. पोलिसांनी सोसायटीतील सदस्यांचा जबाब न नोंदवता गुन्हा दाखल केला. शवविच्छेदनात कुत्र्यांच्या आजाराचा उल्लेख हवा. एकतर्फी खोटी तक्रार दाखल करणे चुकीचे आहे. पोलिस म्हणाले की, या प्राणिमित्रांचा आम्हालादेखील त्रास आहे. तरीही सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या आहेच. परंतु, या तथाकथित प्राणिमित्रांचे प्रकार असामाजिक आहेत. आम्हाला न्याय मिळावा.

- संदीप कडवे, अध्यक्ष, निसर्ग सिटी सोसायटी

आम्हाला शेजारच्या सोसायटीधारकांनी कुत्र्यांचा प्रकार कळवला, म्हणून आम्ही या ठिकाणी धाव घेतली. कुत्र्यांना सोसायटीचालकांनी टेरेसवर डांबून ठेवले होते. रात्रभर कुत्री उपाशी राहिली. त्यांना पाणीदेखील मिळाले नाही. सुरक्षारक्षकाच्या हातात काठी असल्याने कुत्रे घाबरले. त्यांना रेबीज वगैरे काही नव्हता. मी पूर्वी त्या सोसायटीत कराटे घ्यायचो. परंतु, त्याचा या घटनेशी संबंध नाही. सध्या मी दुसऱ्या सोसायटीत कराटे शिकवतो.

- तेजप्रताप पासवान, प्राणिप्रेमी

या घटनेचा तपास सुरू आहे. कुत्र्यांच्या हाडाला मार लागला आहे. शवविच्छेदनानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेला अहवाल पाठवावा लागणार आहे, त्यानंतर काही बाबी समजतील.

- विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : कोकणसह मुंबई, पुण्यात अतिमुसळधार! ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट; मराठवाड्यातही जोरदार पावसाचा इशारा

Latest Marathi News Live Updates : वारणा धरणातून २४६३० क्यूसेक ने विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune Rain: पावसामुळे पुण्याची विमानसेवा विस्कळित; एक विमान हैदराबादला वळविले, तीन विमानांना उशीर

प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत! ज्याच्यासोबत संसाराची स्वप्नं रंगवली, प्रेयसीने त्यालाच संपवलं, संभाजीनगरात उघड झाला भीषण कट

Kolhapur Rain Red Alert : कोल्हापुरात अतिवृष्टी, घाट माथ्यावर रेड तर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, किती दिवस संततधार?

SCROLL FOR NEXT