worker12.jpg 
पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील उद्योजक राबवतायंत 'हा' नवा फंडा 

सुधीर साबळे

पिंपरी : लॉकडाउनमुळे उद्योनगरीमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी गावी निघून गेल्यामुळे उद्योजकांची अडचण झाली आहे, त्यामुळे सध्या कमी पडत असणाऱ्या मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी अनेक उद्योजकांनी एकमेकांकडे काम करणाऱ्या कामगारांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. उत्पादनात खंड न पाडता ते कायम सुरु ठेवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या या अनोख्या नव्या फंड्याचा फायदा उद्योजक आणि कामगार या दोघांनाही होत आहे. सध्या उद्योजकांकडून राबवण्यात येत असणारा हा फंडा पुढील सहा महिन्यांपर्यंत राबवला जाणार असण्याची शक्‍यता असल्याचे काही उद्योजकांनी सांगितले. 

'या' कारणामुळे निर्माण झाली ही परिस्थिती.... 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर उद्योगनगरीमध्ये काम करणारे परराज्यातील कामगार आपल्या गावी निघून गेले, ते अद्याप परतलेले नाहीत. दरम्यान, मे महिन्याच्या मध्यास उद्योगनगरीमधील कंपन्या सुरु झाल्या त्याला आता महिन्याचा अवधी झाला आहे. मात्र, कंपन्यांना आवश्‍यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे अनेक उद्योजकांनी कामासाठी एकमेकांकडील कामगारांचा आधार घेण्याची शक्‍कल लढवली आहे. उद्योगनगरीमधल्या कंपन्यांमध्ये आठ तासच काम सुरु आहे. अनेक कंपन्यांकडे कमी जास्त जास्त प्रमाणात काम असल्यामुळे कामगारांचा वापर सहमतीने करण्यास उद्योजकांनी सुरुवात केली आहे. आपण ज्या कंपनीत काम करतो, त्याठिकाणी कामाचे आठ तास पूर्ण झाल्यानंतर तीन ते चार तास हे कामगार अन्य ठिकाणी काम करत आहेत. अन्य ठिकाणी केलेल्या जादा कामामुळे कामगारांना त्याचा आर्थिक फायदा होत आहे. 

कामगारांना परतण्यात या आहेत अडचणी.... 
परराज्यात आणि राज्यातील अन्य शहरांमध्ये राहाणाऱ्या कामगारांना पुन्हा इथे परतण्यासाठी अनेक अडचणी आहेत. राज्य सरकारने जिल्हाबंदी कायम ठेवलेली आहे, त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पास काढणे सक्‍तीचे आहे. परराज्यातून परतणाऱ्यासाठी देखील तिच स्थिती आहे. सार्वजनिक वाहतूक देखील बंद आहे, त्यामुळे प्रवास करुन यायचे कसे हा प्रश्‍न कामगारांसमोर उभा आहे. 

या कर्मचाऱ्यांची आहे कमी.... 
उद्योगनगरीमधील कंपन्यांमध्ये सध्या वेल्डर, फिटर, पेंटर, हेल्पर, प्रेस ऑपरेटर, सीएनसी, व्हीएमसी ऑपरेटर यांची मोठ्या प्रमाणात कमी जाणवत आहे, त्यासाठी उद्योजक एकमेकांकडील कर्मचाऱ्यांचा आधार घेत आहेत. 

कामगार म्हणतात...
लॉकडाउनच्या काळात उद्योग बंद होते, त्यामुळे दोन महिने बसूनच होतो. आता अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे, त्यामुळे काही लोक जादा काम करण्यासाठी बोलवत असतात. नोकरी सांभाळून ते काम करतो, त्यामुळे जास्तीच्या दोन पैशांचा फायदा होत असल्याचे संतोष शिंदे यांनी सांगितले. 

 

उद्योगनगरीत काम करणारे अनेक कामगार आपआपल्या गावी निघून गेल्यामुळे मनुष्यबळाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. कामगारांना परतण्यासाठी रेल्वे, बसची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांना येता येत नाही. रेल्वे सुरु झाल्या असल्या तरी त्याचे तिकीट मिळण्यास भरपूर कालावधी लागत आहे, याखेरीज इथे परतल्यानंतर त्यांना 15 दिवस क्‍वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतरच इथल्या मनुष्यबळाची परिस्थिती पूर्ववत होईल. 

-इरफान मुजावर, लेबर कॉन्ट्रॅक्‍टर 

चौकट 
उद्योगनगरीतील उद्योगांची संख्या : 11, 500 
कोरोनापूर्वी असणारी कामगारांची संख्या : 4, 50, 000 
सध्या असणारी कामगारांची संख्या : 2, 00, 000

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax Notice: खबरदार! मित्रांचं बिल भरण्यासाठी तुमचं क्रेडिट कार्ड वापरताय? तर आयकर विभाग कारवाई करणार

Asia Cup 2025: गौतम गंभीर आल्यापासून हे असंच होतंय... Arshdeep Singh वर होणाऱ्या अन्याविरोधात R Ashwin ने उठवला आवाज

Video : अंगणात खेळत होता 3 वर्षांचा चिमुकला; अचानक समोर आले दोन साप, पुढे जे घडलं...धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

BRT Stations: बीआरटी दुरुस्तीसाठी ‘तू-तू-मैं-मैं’; बसथांब्यांप्रश्‍नी महापालिका ‘पीएमपीएमएल’चे एकमेकांकडे बोट

धोकादायक ट्रेंड! सोशल मीडिया गाजणाऱ्या '3D स्टाईल' फोटोमुळे पर्सनल डेटा चोरीला

SCROLL FOR NEXT