पिंपरी-चिंचवड

चीनचा निषेध म्हणून आयटी अभियंता दांपत्याने काय केलं पाहा...

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : चीनच्या सैन्याने आपल्या देशाच्या हद्दीत शिरून लष्करी जवानांवर हल्ला केला. यात आपले वीस जवान हुतात्मा झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि चिनी सैन्य व देशाचा निषेध करण्यासाठी चिंचवडमधील एका कुटुंबाने तब्बल ८७ हजार रुपये किमतीच्या चिनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदीची ऑर्डर रद्द केली. मोबाईल फोन अडगडीत टाकून दिला. मुलांची चिनी बनावटीची खेळणी भंगारात काढली. हे कुटुंब आहे चिंचवड गावातील केशवनगर मधील विवेक वसाहतीत राहणारे.  एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीतून लेखाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या आजोबांचे. त्यांचे चिरंजीव व सून दोघेही त्याच कंपनीत आयटी अभियंता आहेत.

चीनचा निषेध करणाऱ्या चिंचवडच्या कुटुंबात आठ जण आहेत. आजी गृहिणी आहेत. त्यांचा मुलगा व सून आयटी अभियंता आहेत. त्यांना दोन कन्या. मोठी अकरा वर्षांची आणि छोटी तीन वर्षांची. कोरोनामुळे आयटी अभियंता दांपत्याचे वर्क फ्रॉम होम सुरू होते. आता शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे कम्प्युटर घरात असावा, असा विचार आजोबांनी केला. ते लेखक असल्यामुळे कम्प्युटरचा उपयोग लेखनासाठी, मुलगा व सुनेच्या कामासाठी आणि नातींच्या शिक्षणासाठी होईल, असा विचार होता. त्यासाठी मुहूर्त साधायचा होता सहा जुलैचा. मुलाच्या वाढदिवसाचा. त्याला अनोखी गिफ्ट देण्याचा. त्यासाठी कम्प्युटरचा सर्व संच, प्रिंटर, आयपॅड असे सुमारे ८७ हजार रुपयांचे मेड इन चायना इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आठ दिवसांपूर्वी ऑनलाईन बुक केले. कॅश ऑन डिलिव्हरी असा व्यवहार ठरला. सर्व वस्तू डिलिव्हरीचा कालावधी होता जुलैचा पहिला सप्ताह. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बुक केल्यानंतर दोन-एक दिवसांनी चिनी सैन्याने आपल्या जवानांवर हल्ला केला. वीस जवान शहीद झाले आणि चीन विरुद्ध देशात संतापाची लाट उसळली. ती चिंचवडच्या केशवनगरमधील विवेक वसाहतीत आजोबांच्या घरापर्यंत पोचली. त्यांनी मुलगा व सुनेच्या सूचनेनुसार कम्प्युटर संच खरेदीची आॅर्डर रद्द केली. चिनी बनावटीचा स्मार्ट फोन अडगडीत टाकून दिला. नातींची चिनी बनावटीची सर्व खेळणी भंगारात काढली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

चीनचा आम्ही निषेध करीत आहोत. मुलगा व सुनेसह निर्णय घेतला की, यापुढे कोणतीही चायना मेड वस्तू घ्यायच्या नाहीत. म्हणून कम्प्युटर व अन्य वस्तू खरेदीची आॅर्डर रद्द केली. मोबाईल फोन व चिनी खेळणी भंगारात टाकून दिली. आता येथून पुढे फक्त देशात तयार होणा-याच वस्तू वापरणार आहे, असे आजोबांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT