Traffic-Police 
पिंपरी-चिंचवड

... अखेर ती पैसे स्वीकारणारी महिला वाहतूक पोलिस निलंबित

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - वाहतूक नियमन करत असताना पिंपरीतील शगुन चौकात एका वाहतूक पोलिस महिलेने कारवाई न करण्यासाठी एका तरुणीकडून पैसे घेतले. याचा व्हिडीओ सोशलमीडियावर जोरदार व्हायरल झाला. याबाबत वाहतूक विभागाकडून कसुरी अहवाल सादर केल्यानंतर संबंधित वाहतूक पोलिस महिलेचे निलंबन करण्यात आले.

स्वाती सोन्नर असे निलंबन झालेल्या वाहतूक पोलिस महिलेचे नाव आहे. त्या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत. सोन्नर आणि त्यांचे सहकारी वाहतूक पोलिस मंगळवारी (ता. 15) पिंपरी मधील साई चौकात कर्तव्य बजावत होत्या. दरम्यान, तिथे एका दुचाकीवरून दोन तरुणी आल्या. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित वाहतूक पोलिस महिलेने त्यांना सांगितले. ही कारवाई टाळण्यासाठी काही रक्कम घेण्याचे ठरले. त्यानंतर पोलिस महिलेने ती रक्कम स्वीकारली.

दुचाकीवरील  तरुणीने वाहतूक पोलिस महिलेच्या खिशात पैसे ठेवले आणि पोलिस महिलेने ते स्वीकारले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडीओ  पोहोचल्यानंतर कारवाई सुरु झाली. सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांनी याबाबत कसुरी अहवाल उपायुक्तांकडे सादर केला. त्यावर निर्णय घेत सोन्नर यांचे निलंबन करण्यात आले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात १७ वर्षांच्या मुलाची हत्या, पोलिसांनी भर पावसात काढली गुन्हेगारांची धिंड; मृताच्या आईने आरोपींना सर्वांसमोर चपलेने मारले

IND vs ZIM 1st T20I: भारतीय संघात पदार्पणासाठी ४ युवा खेळाडूंमध्ये स्पर्धा; वैभव सूर्यवंशीसारखा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज आघाडीवर, कशी असेल Playing XI?

Live Updates Marathi : संसद भवन परिसरात विरोधकांचे आंदोलन

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांचे टेन्शन वाढले! सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; चांदीही चमकली, पाहा ताजे भाव

जय-शरूमध्ये फुलणार प्रेमाचा बहर, 'सनई चौघडे' मालिकेतील प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'दोघांची केमिस्ट्री...'

SCROLL FOR NEXT