Memoirs 
पिंपरी-चिंचवड

पाऊलखुणा मंदिरांच्या 3 : वाकडमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील हे अद्भुत शिलालेख पाहिलंय का? (व्हिडिओ)

सुवर्णा नवले

पिंपरी - वाकड येथील मुळानदीकाठी असणारे श्री म्हातोबा मंदिराच्या बाहेर जुन्या बांधकामातील दगडी शिळा रंग देऊन उभी आहे. हा दगड म्हणजे सोनेरी रंगातील शिलालेख आहे. तो छत्रपती संभाजी महाराजांच्या १६८१ मधील आहे. त्यावर सहा गावांचा उल्लेख आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील अनेक गावांचा इतिहास क्षेत्रपाल देवता, उत्सव परंपरा व कथांनी व्यापला आहे. त्यातीलच ग्रामदैवता म्हणजे श्री म्हातोबा. ग्रामदैवता व त्यांचे उत्सव, आचार-परंपरा यांनी सबंध ग्रामीण जीवनाच्या सामाजिक व धार्मिक जीवनाचा मोठा इतिहास 
प्रकाशझोतात आला आहे. या ग्रामदैवतांशी स्थानिक स्तरावर अनेक कथा दंतकथा, चालीरीती, परंपरा जोडलेल्या आहेत. शिलालेखानुसार हिंजवडी गावातील जांभुळकर यांनी वाकडमध्ये येऊन हे मंदिर बांधले आहे. यातून मूळचा हिंजवडीचा असणारा म्हातोबा देव वाकड येथे कशाप्रकारे आला, याच्या अनेक दंतकथा या भागात प्रचलित आहेत.

येथील ग्रामस्थांना आजही यात्रेवेळी मान दिला जातो. जांभुळकर परिवाराला वाकड-हिंजवडी गावातील यात्रेत बगाडाचा मान आहे. या दैवतावर सर्वांत आधी ज्येष्ठ संशोधक दामोदर कोसंबी यांनी प्रकाश टाकला. नंतर ज्येष्ठ भाषा संशोधक विश्‍वनाथ खैरे यांनीही प्रयत्न केला. त्यानंतर या दैवताविषयी प्रणव पाटील यांनी अभ्यास सुरू केला आहे.

एकल स्वरूपातील स्मृतिशिल्पे
हिराई-सीताई या देवी म्हणजे मुळूक घराण्यातील दोन मुली. हे घराणे खेडमधील चासकमान येथे राहणारे. म्हातोबा देवाने त्या मुलींची मागणी घातली; परंतु ती नाकारल्यामुळे या देवाने त्यांना पळवून आणल्याची आख्यायिका वाकडमध्ये आहे. श्री म्हातोबा देवाच्या या दोन बायका होत्या. वाकड येथील डोहात त्या लुप्त झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येथे या देवींचे मंदिर उभे राहिले. अभ्यासकांच्या मते सप्तमातृकांपैकी या दोन देवी असाव्यात, असा अंदाज बांधला जात आहे. मंदिरात असलेली पूर्वजांची प्राचीन स्मृतिशिल्पे ही एकल स्वरूपातील आहेत. चैत्र-पौर्णिमेला मुळूक घराण्याचे भाविक येथे दर्शनासाठी येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT