पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने शुक्रवारी (ता. 28) सायंकाळी शहर परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सकाळपासून दुपारपर्यंत ऊन असल्याने रेनकोट व छत्रीशिवाय घराबाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली. 

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात पाऊस सुरू होता. कधी ऊन-सावली तर कधी ऊन-पाऊस असा खेड रंगलेला असायचा. त्यामुळे पुणे-मुंबई, मुंबई-बंगळूर (देहूरोड-कात्रज बाह्यवळण), पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडले होते. अनेक ठिकाणी चिखल साचला होता. सखल भागात पाणी साचले होते. यंदाच्या गणेशोत्सवात लाडक्‍या गणरायाचे स्वागतही पावसातच करावे लागले होते. रविवारपर्यंत (ता. 23) पाऊस सुरूच होता. 

सोमवारपासून (ता. 24) पावसाने विश्रांती घेतली. गेल्या दोन दिवसांपासून तर कडक ऊन पडत होते. शुक्रवारी (ता. 28) सकाळपासूनच ऊन पडले होते. मात्र, दुपारी तीननंतर ढग दाटून आले आणि पाचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे महामार्गाच्या कडेची झाडे, ग्रेडसेपरेटर, उड्डाणपुलांचा दुचाकीस्वारांना आसरा घ्यावा लागला. तर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या काही पादचाऱ्यांनी दुकानांचा आसरा घेतला. साधारणतः एक तास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर ढगाळ वातावरण कायम होते. 

पावसात बाप्पांचे विसर्जन 

गणेशोत्सवाचा शुक्रवारी सातवा दिवस होता. त्यामुळे सातव्या दिवसांच्या गणरायाचे अनेक भाविकांनी विसर्जन केले. विशेष म्हणजे जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव येथील सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्ती सातव्या दिवशी विसर्जन करण्याची परंपरा आहे. आज पाऊस आल्याने गणेशभक्तांना भिजतच बाप्पांचे विसर्जन करावे लागले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT